Ajit Pawar Sakal
पुणे

Ajit Pawar : कवियत्री शांता शेळके नाट्यगृहउर्वरित कामांसाठी ३ कोटी रुपये देणार

'मराठी साहित्य क्षेत्रात मनाचा तुरा रोवणाऱ्या कवियत्री. शांता शेळके यांच्या नावाने उभारलेल्या नाट्यगृहचे उर्वरित कामांसाठी आवश्यक तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात येईल.

डी. के. वळसे पाटील

मंचर - 'मराठी साहित्य क्षेत्रात मनाचा तुरा रोवणाऱ्या कवियत्री. शांता शेळके यांच्या नावाने उभारलेल्या नाट्यगृहचे उर्वरित कामांसाठी आवश्यक तीन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात येईल. येथे उभारलेले नाट्यगृह साहित्य क्षेत्राला उर्जा देणारे ठरेल” असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयाच्या अवारात उभारलेल्या कवियत्री शांता शेळके नाट्यगृह उद्घाटन प्रसंगी पवार बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हा पोलीस अधीक्षक ग्रामीण पंकज देशमुख, माजी आमदार पोपटराव गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बप्पा बहीर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी अभियंता रावबहादूर पाटील,तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक दत्तात्रय जाधव, तहसीलदार संजय नागटिळक, गटविकास अधिकारी प्रमिला वाळूंज उपस्थित होते.

पवार म्हणाले, 'कवियत्री शांता शेळके यांचा जन्म इंदापूर तालुक्यात झाला. त्यांचे बालपण मंचर परिसरात गेले. ज्ञान, गुण, कौशल्यवृद्धीसाठी चर्चा, ज्ञान, संवाद, परिसंवाद, व्याख्यान, परिषद अशा प्रकारच्या सांस्कृतिक केंद्राची गरज होती. याकामाचा सतत पाठपुरावा दिलीप वळसे पाटील यांनी केला. 'शांता शेळके' यांच्या नावाला साजेसे अत्याधुनिक आणि अतिशय सुंदर असे एक हजार आसन क्षमतेचे सभागृह उभारण्यात आले आहे. सभागृहाचे उद्घाटन आपल्या जीवनात आनंदाचा, अभिमानाचा आणि कर्तव्यापूर्तीचा क्षण आहे.'

वळसे पाटील म्हणाले, 'विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सभागृहाची आवश्यकता लक्षात घेऊन हे सर्व सुविधायुक्त सभागृह उभारण्यात आले आहे. दर्जेदार शिक्षण देणारे महाविद्यालय अशी येथील महाविद्यालायाची ख्याती आहे. या महाविद्यालयातून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी देश विदेशात नोकरी करत आहेत.'

आढळराव पाटील, सहसंचालक दत्तात्रय जाधव व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पानगव्हाणे यांची मनोगते झाली.

'शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय व शासकीय तंत्रनिकेतन येथे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी मागणीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावेत, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.'

- अजित पवार , उपमुख्यमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tenth Schedule म्हणजे काय? राहुल नार्वेकरांच्या निकालावर कपिल सिब्बलांचा एकच मुद्दा ठरणार गेम चेंजर?

Gold Silver Price Today : शेअर बाजार सुरू होताच सोने-चांदीच्या दरात घसरण; कालच्या तुलनेत किती बदल?

IND vs SL 1st Test: भारताच्या विजयी मार्गात विघ्न! गॉल मैदानावरून चिंता वाढवणारी बातमी; नेमकं काय झालंय?

Maratha Youth: मराठा तरुणांसाठी दिलासा! महामंडळाच्या कर्ज योजनेतील अटी लवकरच शिथिल होणार; ८०० कोटींचा निधी मागणार

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

SCROLL FOR NEXT