बंगल्यात पोकर जुगाराचा अड्डा  sakal
पुणे

भाड्याच्या बंगल्यात पोकर जुगाराचा अड्डा

गुन्हे शाखेच्या पथकाचा छापा, एकास अटक, परदेशी चलन, मद्यासह 58 लाख रुपयांचा ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भाड्याने घेतलेल्या बंगल्यामध्ये अवैधरीत्या पोकर जुगार खेळण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात हा प्रकार पुढे आला असून बंगल्यातून विदेशी मद्य, परकीय चलन, जुगाराची सामुग्रीसह 58 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. जितेन जगदिप सिंग (वय 41, रा.सैनिक नगर, क्‍लाऊड नाईन सोसायटी, बंगला नंबर 16, कोंढवा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार, मटका प्रतिबंधक कायद्यानुसार कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेन जगदिप सिंग इव्हेंट मॅनजमेंट करण्याचे काम करतो. त्याने कोंढव्यातील सैनिकनगर जवळ एक बंगला भाडेतत्वावर घेतला होता. संबंधित बंगल्यामध्ये काही व्यक्ती पोकर जुगार खेळतात तसेच त्यांना संबंधित व्यक्ती विदेशी मद्य पुरविते, अशी खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांकडून संबंधित माहितीची खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने बंगल्यावर छापा टाकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

प्रभुकुंज ते दुबईचे रेस्टॉरंट! आशा ताईंच्या निधनानंतर त्यांच्या अफाट मालमत्तेचा मालक कोण? त्यांच्या मृत्युपत्रानुसार...

Match Fixing: भारताने जिंकलेल्या T20 World Cup 2026 स्पर्धेत फिक्सिंग? न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यावरच संशय, ICC ने सुरू केलाय तपास

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेला 'या' शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करा; आयुष्यात येईल अखंड समृद्धी

हा मुलगा खरंच १४ वर्षांचा आहे? ललित मोदीचं Vaibhav Sooryavanshi बाबत खळबळजनक विधान; म्हणाले, माझा मुलगा या वयाचा आहे...

SCROLL FOR NEXT