‘पोकरा’अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी साडेबारा हजारांवर अर्ज
परभणी जिल्ह्यातील स्थिती; ३२ लाभार्थ्यांना १५ लाख ७३ हजार रुपये अनुदान वाटप
ॲग्रोवन वृत्तसेवा
................................
परभणी ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० अंतर्गत (हवामानानुकूल कृषी प्रकल्प ः प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेसीलंट ॲग्रीकल्चर ः पोकरा) वैयक्तिक लाभाच्या घटकांसाठी परभणी जिल्ह्यातील १६६ गावातील ११ हजार ८७५ शेतकऱ्यांनी १२ हजार ६३४ अर्ज केले आहेत. शुक्रवार (ता.८) पर्यंत विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या ३२ लाभार्थी शेतकऱ्यांना १५ लाख ७३ हजार रुपये अनुदान थेट लाभ हस्तांतरण प्रणाली (डिबीटी) अदा करण्यात आले. दरम्यान,मार्गदर्शक सूचना नसल्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप शेडनेटगृह, पॉलिहाऊस, विहिर, यांत्रिकीकरण या घटकांच्या लाभासाठी अर्ज करता येत नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
पोकरा २.० प्रकल्प अंतर्गंत परभणी जिल्ह्यातील १७३ गावांची निवड झालेली असून त्यापैकी ७ गावांना शिवार नाही.त्यामुळे १६६ गावातील शेतकरी अर्ज करत आहेत. याअंतर्गंत वेब पोर्टल तसेच महाविस्तार एआय ॲपद्वारे उपलब्ध आहे. https://dbt-ndksp.mahapocra.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करता येतील. फार्मर आयडीचा (शेतकरी ओळख क्रमांक) वापर करून थेट लॉगीनची सुविधा आहे.नोंदणीची आवश्यकता नाही. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतजमिनीचा तपशील उपलब्ध करून घेतला जात असल्याने शेतकरी स्तरावरून ७/१२ व ८ अ अपलोड करण्याची आवश्यकता नाही. या प्रकल्पांतर्गत ५ हेक्टर पर्यंत जमीनधारणा असलेल्या शेतकऱ्यांना लाभ देय राहील. बीजोत्पादन या घटकासाठी कमाल जमिनधारणेची अट असणार नाही. भूमिहीन कुटुंबातील सदस्याकरिता शेळीपालन या घटकाचा लाभ देय राहील. सामाईक जमीन धारणा असलेल्या लाभार्थी यांनी इतर खातेदाराचे संमतीपत्र पोर्टल वर उपलब्ध कारण देण्यात आलेल्या नमुन्यामध्ये सादर करणे आवश्यक आहे. वैयक्तिक लाभाच्या घटकांअंतर्गत फळबाग लागवड, ठिबक सिंचन संच,तुषार सिंचन संच,वैयक्तिक शेततळे, शेततळे अस्तरीकरण, शेततळ्यातील मत्स्यपालन, बीजोत्पादन ,रेशीम उद्योग, शेडनेटगृह-हरितगृहामधील लागवड साहित्य,गांडूळ खत व नाडेप,विहीर पुनर्भरण,वानिकी आधारित वृक्ष लागवड, बांबू लागवड,पाईप व पंप संच (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील लाभार्थी), शेळीपालन (भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती,विधवा,परितक्त्या व घटस्फोटीत महिला ) यांचा समावेश असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.
........................
परभणी जिल्हा पोकरा २.० अंतर्गत घटकनिहाय अर्ज स्थिती
घटक....शेतकरी...अर्ज संख्या
फळबाग लागवड....१०५०...१२५२
सूक्ष्म सिंचन...६६५७...७१०४
वैयक्तीक शेततळे...३३९...३३९
शेततळे अस्तरीकरण...१३१...१३४
विहिर पुनर्भरण...६६६...६६८
बीजोत्पादन...४४०...५२२
सेंद्रिय निविष्ठा निर्मिती युनिट...४५६...४५६
संरक्षित लागवड....१२०...१२०
संरक्षित सिंचन...१७०...१७०
कृषी वानिकी...१३५...१३८
वृक्षलागवड...४०७...४२३
रेशीम शेती...१०५७...१०६१
एकात्मिक शेती पध्दती-भूमीहिन...१९५...१९५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.