पुणे

नगर ः पोळा सणांवर दुष्काळाचे सावट

CD

पोळा सणावर दुष्काळाचे सावट

खरेदीसाठी शेतकऱ्यांचा हात आखडता, बहुतांश भागांत पाऊस नसल्याने चिंता

अॅग्रोवन वृत्तसेवा
अहिल्यानगर ः बैलपोळा सण चार दिवसांवर आला आहे. मात्र, यंदा राज्यातील बहुतांश भागांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. खरीप पिकांचे जवळपास ८० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले असून, रब्बीच्या पेरण्या होतील की नाही, याचीही शाश्वती नाही. या पार्श्वभूमीवर श्रावणी बैलपोळा सणावर दुष्काळाचे सावट आहे.
शेतकरी बैलपोळ्यानिमित्त बैल सजावटीचे साहित्य तसेच अन्य वस्तूंची खरेदी करतात. मात्र, यंदा या खरेदीसाठी शेतकऱ्यांचा उत्साह कमी झाल्याचे दिसत आहे.
शेतकऱ्यांसाठी वर्षभरातील सणांमध्ये श्रावणी पोळा हा महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी बैल सजावटीच्या साहित्यासह अन्य वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. शेतीची तसेच पाऊस-पाण्याची स्थिती चांगली असल्यास पोळा सणाचा उत्साह अधिक असतो. यंदा मात्र पावसाअभावी शेती अडचणीत आली आहे.
राज्यातील डोंगरपट्ट्यात चांगला पाऊस झाल्याने त्यावर अवलंबून असलेली उजनी, जायकवाडी, कोयना यांसह मोठी धरणे भरली आहेत. मात्र, घाटमाथा वगळता अन्य भागांत यंदा अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. प्रामुख्याने अहिल्यानगर, संपूर्ण मराठवाडा, सोलापूर, विदर्भातील काही जिल्हे तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांतील काही भागांत पावसाची प्रतीक्षा आहे. अनेक भागांत अद्याप पाणी वाहील एवढाही पाऊस झालेला नाही.
महिनाभरापासून पाऊस पूर्णतः गायब असल्याने दुष्काळी पट्ट्यातील सोयाबीन, मूग, तूर, उडीद आणि कापसाची पिके अडचणीत आली आहेत. काही भागांत ७० ते ८० टक्के पिके वाया गेल्यात जमा आहेत. पावसाअभावी खरीप पिकांची झालेली दुरवस्था आणि शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी याचा थेट परिणाम पोळ्याच्या खरेदीवर झाला आहे.
पोळ्यानिमित्त बाजारात शेळी, दुभती जनावरे, बैल, म्हशी यांच्यासह भाजीपाला, आडत आणि जीवनावश्यक वस्तूंची दुकाने मोठ्या प्रमाणात थाटली जातात. त्यामुळे नेहमी गजबजणारा बाजार यंदा पोळा सणाच्या तोंडावर तुलनेने ओस पडल्याचे चित्र आहे.

फोटो
बोधेगाव, ता. शेवगाव ः पोळा सण चार दिवसांवर आला आहे. बाजारात बैल सजावटीच्या साहित्याची विक्री करणारी दुकाने सज्ज असली तरी शेतकऱ्यांनी मात्र साहित्य घेण्याकडे पाठ फिरवली आहे. (छायाचित्र ः उद्धव देशमुख, बोधेगाव)
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission ला 10 महिने पूर्ण, सॅलरी-पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर काय झालं? जाणून घ्या लेटेस्ट अपडेट

IND vs AFG : जसप्रीत बुमराह 'फिट' न झाल्यास, कोण घेईल त्याची जागा? ३ जबरदस्त गोलंदाज शर्यतीत, एक तर जस्सी नसतानाच चमकतो...

MPSC पेपरफुटी प्रकरणात नरहरी झिरवाळांचे स्वीय सहाय्यक गणेश देवरे यांचा खुलासा; म्हणाले, ‘मी दोषी आढळल्यास...’

कुंभ, मीन अन् मेष राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीपासून सुटका कधी? जाणून घ्या टाइमलाइन

Marathi News Live Updates: भागलपूर आणि नौगछिया भागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्र्याकडून हवाई पाहणी

SCROLL FOR NEXT