Crime sakal
पुणे

बारामतीत वेश्याव्यवसाय विरुद्ध पोलीस कारवाई; तिघांवरती गुन्हा दाखल

बारामती औद्योगिक विभागामध्ये आरटीओ कार्यालयाच्या समोरील राजलक्ष्मी लॉजमध्ये अवैद्य वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

कल्याण पाचांगणे

बारामती औद्योगिक विभागामध्ये आरटीओ कार्यालयाच्या समोरील राजलक्ष्मी लॉजमध्ये अवैद्य वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.

माळेगाव - बारामती औद्योगिक विभागामध्ये आरटीओ कार्यालयाच्या समोरील राजलक्ष्मी लॉजमध्ये अवैद्य वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी बारामतीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या विशेष पथकाने अचानकपणे राजलक्ष्मी लॉजवरती छापा टाकला, या कारवाईमध्ये तीन पुरुष व स्त्रिया अवैद्य वेश्या व्यवसाय करताना आढळून आल्या. त्यानुसार पोलीस पथकातील पोलीस हवलदार शिवदास काटकर यांनी आज बारामती तालुका पोलीस ठाण्यात संबंधित व्यावसायिका विरुद्ध फिर्याद दिली.

त्यामध्ये किरण बापू पाटील( रा. हाजी मलंग रोड एकविरा देवी पिसवली ता. भिवंडी, ठाणे), युवराज लोखंडे (पूर्ण नाव पत्ता माहित नाही), विठ्ठल चव्हाण (पूर्ण नाव माहित नाही, सध्या रा. राजलक्ष्मी लॉज, बारामती.) या संशयित आरोपींचा समावेश आहे. पोलिसांनी वरील आरोपींविरुद्ध स्त्रिया व मुली अलैंगिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 3,4,5,6,7 प्रमाणे गुन्हा दाखल केला. वरील गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेता तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी अधिकचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatreya Hosabale : 'भारताने पाकिस्तानशी संवादाची दारे पूर्णपणे बंद करू नयेत'; RSS सरचिटणीसांचं मोठं विधान, हिंदूराष्ट्राबाबतही केलं भाष्य

SSC HSC Supplementary Exam : दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा १६ जूनपासून; राज्य मंडळातर्फे परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : CBI चं पथक नाशिकमध्ये दाखल; नीट प्रकरणातील संशयित आरोपी शुभम खैरनारचा घेणार ताबा

पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या आवाहनचे पडसाद! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावरून प्रवास; मोर्चा काढत केंद्र सरकारवर टीका

Sangli Wall Collapse : मरगुबाई देवीच्या धार्मिक कार्यक्रमाला गालबोट; वादळी वाऱ्यामुळे अंगावर चिरा-विटांची भिंत कोसळून 5 ते 6 भाविक ठार, 12 जण जखमी

SCROLL FOR NEXT