crime.jpg
crime.jpg 
पुणे

पिंपरीतील 'त्या' दोेन टोळ्या...पोलिस... अन् मग काय...

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : स्वत:च्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांवर पोलिसांनी बुधवारी मोक्काअंतर्गत (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) कारवाई केली. वाकड आणि दिघी येथील या टोळ्या आहेत. 

वाकड पोलिस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणातील टोळीचा प्रमुख अनिकेत अर्जुन चौधरी (रा. लक्ष्मणनगर, थेरगाव) याच्यासह चौघांवर पोलिसांनी मोक्‍का (महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम) अंतर्गत कारवाई केली आहे. 

धीरज श्रीकांत शिंदे (वय 22), अजय सुधाकर शिरसाठ (वय 20), मयूर शिवाजी भोसले (वय 23. रा. सर्व रा. जीवननगर, ताथवडे) आणि समीर बोरकर (पूर्ण नाव, पत्ता उपलब्ध नाही) अशी आरोपींची नावे आहेत. स्वत:च्या वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून संघटितपणे हे सर्वजण गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्यासमोर होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

दिघी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका जबरी चोरीच्या गुन्ह्याच्या तपासात टोळीप्रमुख अविनाश बाळू धनवे (वय 29, रा. वडमुखवाडी, चऱ्होली), ऋषिकेश हनुमंत गडकर (वय 23) आणि जगदिश संजय काकडे (वय 20, रा. दोघेही इंद्रायणी पार्क, आळंदी) हे तिघे संघटितपणे चोऱ्या करीत असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी कराडमध्ये दाखल

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT