पुणे

उरुळीतील मटका जुगारावर कारवाई

CD

उरुळी कांचन, ता. ६ : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बाजार मैदान परिसरात सुरू असलेल्या कल्याण क्लोज मटका जुगारावर उरुळी कांचन पोलिसांनी किरकोळ कारवाई करत दोघांना पकडले. या कारवाईत पोलिसांनी ९२० रुपये रोख रक्कम, मटका जुगाराच्या स्लिप बुकसह अन्य साहित्य जप्त केले. या प्रकरणी जुगार खेळविणाऱ्या दोघांसह त्यांना मटका चालविण्यास सांगणाऱ्या आणखी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. २) सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गस्तीवर होते. त्यावेळी बाजार मैदान येथील संतोष गायकवाड यांच्या इमारतीच्या आडोशाला काहीजण कल्याण क्लोज मटका जुगार खेळवत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सायंकाळी पावणेसात वाजता संबंधित ठिकाणी कारवाई केली. यावेळी गणेश शांताराम कांचन (वय ४२, रा. बाजार मैदान, उरुळी कांचन) आणि संतोष रामचंद्र चव्हाण (वय ४५, रा.यशवंतनगर, यवत, ता. दौंड) हे दोघे लोकांकडून पैसे घेऊन कल्याण क्लोज मटका जुगार खेळवत असल्याचे आढळले. दरम्यान, चौकशीदरम्यान हा मटका जुगार राजेंद्र उर्फ राजू पवार (रा. जय मल्हार रोड, उरुळी कांचन) आणि विक्रांत उर्फ विकी कांचन (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन) यांच्या सांगण्यावरून चालविला जात असल्याचे पकडलेल्या दोघांनी पोलिसांना सांगितले. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सुनील सस्ते करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CBSE Date Sheet 2027: सीबीएसईच्या दहावी-बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; बारावीची परीक्षा...

Nashik TCS Case: एमआयएम नेते इम्तियाज जलील अधिकृतपणे सहआरोपी; संजय शिरसाटांचा "त्याला तुरुंगात जावेच लागेल" असा थेट घणाघात

Captain Vaibhav Sooryavanshi : १५ व्या वर्षी वैभव सूर्यवंशी बनला टीमचा कॅप्टन! त्याच्या नेतृत्वाखाली बघा कोण कोण खेळणार, मॅच कधी व कुठे होणार?

India Visa Rules Major Change : भारतात राहण्यासाठी आता व्हिसा बंधनकारक! केंद्र सरकारकडून नियमांमध्ये मोठा बदल; 'या' ६ समुदायांवर होणार थेट परिणाम

Latest Marathi News Update : 'गोकुळ' दूध संघात चार शासकीय सदस्य नियुक्त्यांच्या अध्यादेशावर राज्यपालांची सही

SCROLL FOR NEXT