Police action on Gavti Hat Bhatti in Khutbav liquor worth 1 lakh 26 thousand were destroyed Sakal
पुणे

Pune Crime : खुटबाव येथील गावठी हातभट्टीवर यवत पोलिसांची धडक कारवाई; १ लाख २६ हजाराचा माल केला नष्ट

दौंड येथे यवत पोलिसांनी महिला चालवत असलेल्या गावठी दारूबट्टीवर छापा टाकीत १ लाख २६ हजारांचा माल जागीच पेटवून नष्ट केला.

सकाळ वृत्तसेवा

- प्रकाश शेलार

खुटबाव : तालुका दौंड येथे यवत पोलिसांनी महिला चालवत असलेल्या गावठी दारूबट्टीवर छापा टाकीत १ लाख २६ हजारांचा माल जागीच पेटवून नष्ट केला. यासंदर्भात यवत पोलिसांना स्थानिक बातमीदारामार्फत खुटबाव परिसरातील मेहेर टुरिझमच्या पाठीमागे माटोबा तलावाच्या कडेला २ महिला दारू व्यवसाय करत असल्याची बातमी समजली.

माहिती समजतात शनिवार दिनांक २३ रोजी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी पोलीस पथक तात्काळ संबंधित ठिकाणी कारवाईसाठी पाठवले.यावेळी पोलिसांनी आरोपी कमला निर्दोष नानावत (वय ५५ वर्षे राहणार गिरमेवस्ती खुटबाव ता.दौंड जि.पुणे) श्रीदेवी चंदरदेव गुडदावत( वय ४५ वर्ष, राहणार गिरमे वस्ती खुटबाव ) यांना ताब्यात घेतले.

घटनास्थळी ५ हजार लिटरचे कच्चे रसायन, १०५ लिटर गावठी हातभट्टी आदी माल सापडला.पोलिसांनी संबंधित मालावर कारवाई करत दारूचे ड्रम सहित सर्व माल जागेवरच पेटवून दिला., या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक उत्तम कांबळे, हवालदार रामदास जगताप ,मोहन चांदणे, अक्षय यादव ,प्रमोद शिंदे, उमेश गायकवाड ,अजित इंगवले, प्रतीक्षा हांडगे यांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT