police action on midnight bar and hotel hookah parlour pune
police action on midnight bar and hotel hookah parlour pune  sakal media
पुणे

मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेले हॉटेल्स, बारसह बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांकडून कारवाई

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कल्याणीनगर, कोंढवा परिसरातील उच्चभ्रु भागात मध्यरात्रीपर्यंत सुरू असणाऱ्या लेली हॉटेल्स, बारसह बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये काही हॉटेल चालकांवर खटले दाखल करण्यात आले आहे. तर एका हॉटेलमध्ये सुरु असलेल्या बेकायदा हुक्का पार्लरवर पोलिसांनी छापा घालुन तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शहरात कोरोना निर्बंध शिथील झाल्यापासून शहरातील हॉटेल्स चालकांना दिलासा मिळाला असून हॉटेल्स नियमीत सुरु झाली आहे. सध्या रात्री साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत हॉटेल्स चालरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे.

असे असतानाही शनिवारी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत काही भागातील हॉटेल्स, बार, पब सुरु असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या होत्या. काही हॉटेल्सच्याबाहेर व निवासी भागात तरुण-तरुणींकडून मोठ्या प्रमाणात गोंधळ घातला जात असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक यांनी गांभीर्याने दखल घेत मध्यरात्रीपर्यंत सुरू असलेल्या हॉटेल्सवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने हि कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या पाहणीत मुंढवा परिसरातील वॉटस बार, कोंढवा परिसरातील रुफटॉप व्हिलेज, द अजांत जॅक्‍स ही हॉटेल मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार, त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलिस कायदा कलमानुसार कारवाई करण्यात आली.

तसेच कल्याणीनगरमधील द हाऊस अफेअर येथे बेकायदा हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथेही पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी सहा हुक्का पात्र, तंबाखूजन्य पदार्थ जप्त केले. या प्रकरणी हुक्का पार्लरचा व्यवस्थापक सौरभ दत्तात्रय नवगण (वय 35, सिल्व्हर ओक सोसायटी, कल्याणीनगर) प्रसन्न उत्तम पाठक (वय 24, रा. श्री राधा विलास सोसायटी, कल्याणीनगर), श्रवण भुटम मंडल (वय 34, रा. वडगाव शेरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभाग व अंमली पदार्थ विरोधी पथक यांनी संयुक्तपणे हि कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT