पुणे

परप्रांतीय कामगारांची माहिती लपविली; दुकानदारांवर गुन्हा

CD

लोणी काळभोर, ता. ११ : परराज्यातील कामगारांची पोलिस पडताळणी करण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील दोन दुकानदारांवर लोणी काळभोर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव कामगारांची माहिती देणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा बडगा उगारण्यात आला.
लोणी स्टेशन परिसरातील ‘श्री राधे व्हरायटी’ आणि ‘आदित्य कलेक्शन’ या दोन दुकानांमध्ये राजस्थानमधील कामगार कार्यरत होते. पोलिस आयुक्त कार्यालयाने ४ जुलै ते १ सप्टेंबर २०२६ या कालावधीसाठी कामगारांची माहिती देणे अनिवार्य केले आहे. विशेष शाखेच्या सहाय्यक फौजदार भारती होले व पथकाने केलेल्या तपासणीत श्रवण पटेल आणि हडमत सिंह या दुकानदारांनी त्यांच्याकडील कामगारांची (हर्षण देवासी व कुलदीप सिंह) पोलिस पडताळणी केली नसल्याचे उघड झाले.
याप्रकरणी भारती होले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन्ही दुकानदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिसरातील सर्व आस्थापनांनी परराज्यातील कामगारांची माहिती तातडीने पोलिसांना देऊन सहकार्य करावे, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीपकुमार पवार यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India Turbulence Incident : एअर इंडिया फुकेत-दिल्ली फ्लाईटच्या 'त्या' घटनेबाबत धकक्कादायक माहिती समोर; मुख्य पायलटने ओढला होता गांजा

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान T20I मालिका सप्टेंबरमध्ये होणार! ACB कडून तारखांबाबत मोठी अपडेट

Manoj Jarange Patil यांच्या डिफेंडर गाडीवरून नेमकी चर्चा काय?

धक्कादायक! सीलबंद शीतपेयाच्या बाटलीत आढळला केस, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; FDAकडे कारवाईची मागणी

Marathi News Live Updates : 'या' तारखेला होणार संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी

SCROLL FOR NEXT