पुणे

अवघ्या ४८ तासांत रिक्षाचालकाच्‍या खुनाचे आरोपी जेरबंद 

सकाळवृत्तसेवा

माले : अनैतिक संबंधातून रिक्षाचालक मित्राचा खुन करुन फरार झालेल्‍या चार आरोपींना पौड पोलिसांनी ४८ शोधुन अटक केली आहे. गणेश हणमंत पवार (वय ३० रा. वारजे, पुणे) असे खुन झालेल्‍या मयताचे नाव आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याबाबत मयताच्‍या पत्‍नीने पोलिसांत अज्ञात आरोपिंविरुध्‍द फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करुन पोलिसांनी पांडुरंग वीर, रा.सातारा  व त्याचे साथीदार सागर ढेपे, शुभम धुमाळ, सचिन मोहिते सर्व रा.वडगाव निंबाळकर या चौघांना अटक केली आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी मृत गणेश पवार हा रिक्षाचालक होता. तो व आरोपी पांडुरंग वीर हे मित्र होते. मृत गणेशची पत्‍नी व आरोपी पांडुरंग यांचे अनैतिक संबंध होते. त्‍यात मृत गणेश अडथळा ठरत होता. त्‍यामुळे पांडुरंग व त्‍याचे साथीदार सागर, शुभम, सचिन यांनी संगनमताने कट रचला. शुक्रवार संध्‍याकाळी (ता. १६) दारु पिण्‍याच्‍या बहाण्‍याने सर्वजण (पळसे, ता. मुळशी) येथे गेले व रस्‍त्‍याच्‍या कडेला दारु पित बसले. त्‍यावेळी चौघांनी गणेशच्‍या डोक्‍यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. व आरोपी फरार झाले.

रस्‍त्‍याच्‍या कडेला पडलेल्‍या गंभीर जखमी गणेश बद्दल पोलिसांना माहिती मिळाल्‍यावर पौड पोलिसांनी रात्रीत त्‍याला पौड ग्रामीण रुग्‍णालयात व नंतर ससून रुग्‍णालयात दाखल केले परंतू दुस-या दिवशी शनिवार (ता. १७) त्‍याचा मृत्‍यू झाला. गणेशच्‍या पत्‍नीला याबाबत कल्‍पना नसल्‍याने तिने अज्ञात आरोपींविरुध्‍द फिर्याद दिली. 

महाराष्ट्रातील बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

पौड पोलिसांनी तपास सुरु करताच आरोपी व मृताच्‍या पत्‍नीतील अनैतिक संबंधांची माहिती हाती लागली. मुख्‍य आरोपी पांडुरंग यास ताब्‍यात घेऊन पोलिसी खाक्‍या दाखवताच त्‍याने अनैतिक संबधातून साथीदारांच्‍या मदतीने खुनाची कबुली दिली. परंतू त्‍याचे तीन साथीदार अद्यापही फरार होते. आरोपी सातारा जिल्ह्यातील लोणंद तालुक्यातील तुकोबाचीवाडी गावचे हद्दीतील डोंगरात लपून बसल्‍याची माहिती मिळाल्‍यावर पौड पोलिसांनी सापळा लावून त्‍यांना शिताफीने पकडून अटक केली.

पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्‍या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे, अब्दुल शेख, पोलिस नाईक रॉकी देवकाते, सागर बनसोडे, जय पवार, पोलिस शिपाई अक्षय नलावडे, रवींद्र जाधव, सुनिल कदम, सागर नामदास यांच्‍या पथकाने ही कामगिरी केली.

याकामी त्‍यांना पोलिस उप निरीक्षक श्रीकांत जाधव, पोलिस हवालदार संदीप सपकाळ, शंकर नवले, मंगेश लांडगे, संतोष कुंभार, संजय राक्षे, पोलिस नाईक नितीन कदम, पोलिस शिपाई नाना मदने, मयुर निंबाळकर यांनी मदत केली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे हे करीत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT