Police arrested Two person for best PMPML conductor 
पुणे

पुणे : पीएमपीएलच्या वाहकास मारहाण करणारे दोघे गजाआड

समाधान काटे

गोखलेनगर : पीएमपीएलच्या वाहकास मारहाण करणाऱ्या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले. शनिपार ते नीलज्योती (मार्ग क्रमांक ५९) दरम्यान पीएमपीची बससेवेदरम्यान वाहकास दोघांनी मारहाण करत लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती.

शुक्रवारी (ता . १४) सायंकाळी सहाच्या सुमारास बस नीलज्योती थांब्यावर उभी असताना वाहक कैलास रणदिवे हे चालक महादेव शिंदे यांच्याशी गप्पा मारत होते. तेवढ्यात मोटारसायकलवरून दोन युवकांनी बसमध्ये प्रवेश केला आणि रणदिवे यांना मारहाण करण्यास सुरवात केली. हे कृत्य बसमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने मारहाण करणाऱ्या युवकांना पकडण्यात पोलिसांना यश आले.

मुख्यमंत्र्यांनी घेतली गृहमंत्री अमित शहा यांची भेट

सुजित मोरे, प्रतिक सोनगरे दोघेजण राहणार जनता वसाहत, जनवाडी येथील असून पोलिस उपनिरीक्षक मोहन जाधव जनवाडी पोलिस चौकी यांनी दोघांना शुक्रवार (ता.१५) रोजी बेड्या ठोकल्या आहेत.  कलम ३९२, ३२३,५११, ३४ नुसार दोघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांची रवानगी येरवडा जेलमध्ये केल्याची माहिती जाधव यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

आगीत घर गमावलेल्यांना मोठी मदत! आग घटनेत बेघर झालेल्यांना जमीन देण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय; पण नेमकं कुणाला आणि कुठे?

बायकोनं केलेला आरोप खरा ठरला? खरंच थलपती विजयचं अभिनेत्रीसोबत अफेअर? सोशल मीडियावर दोघांचा Viral Video

SCROLL FOR NEXT