Police Commissioner Amitabh Gupta regarding immediate stoppage of malpractices at Bhidewada pune
Police Commissioner Amitabh Gupta regarding immediate stoppage of malpractices at Bhidewada pune sakal
पुणे

भिडेवाडा येथे घडणारे गैरप्रकार तत्काळ थांबिण्याबाबत पोलिसांना निवेदन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भिडेवाड्यात वाढलेला मद्यपी लोकांचा वावर आणि त्यामुळे तेथे घडणारे गैरप्रकार तत्काळ थांबविण्यात यावेत, अशी मागणी भिडेवाडा बचाव मोहीम या संघटनेतर्फे पोलिस आयुक्त अभिताभ गुप्ता यांच्याकडे करण्यात आली आहे याबाबत संघटनेतर्फे आयुक्त गुप्ता यांना निवेदन देण्यात आले.महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी देशातील मुलींची पहिली शाळा भिडे वाडा येथे सुरू केली होती. हे ठिकाण राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी अनेक सामाजिक संघटनाचा मागील काही वर्षापासून लढा सुरू आहे, असे असताना या अतिशय महत्वाच्या ठिकाणी मद्यपी व्यक्तींचा वावर वाढला असून तेथे दारूच्या बाटल्या , वेफर्सची पाकिटे, सिगारेटची थोटके अशा वस्तूंचा खच पडल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

या पार्श्वभूमीवर भिडेवाडा बचाव मोहीम या संघटनेचे संस्थापक प्रशांत फुले, पाक्षिक अरिहंतच्या संपादिका गीताई गायकवाड यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना भेटून याबाबतचे निवेदन दिले. याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास करण्यासाठी नवीन पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाईल. त्यांच्या तपासानंतर पुढील कारवाई करू, असे सांगून तेथे जाऊन आश्वासन पोलिस आयुक्त गुप्ता यांनी दिले. दरम्यान, पुणे महापालिकेने वाड्याच्या सुरक्षेसाठी येथे सुरक्षारक्षक नेमावा. भिडे वाड्याचे राष्ट्रीय स्मारक उभारून येथे पुन्हा मुलींसाठी शाळा सुरु करावी, अशी मागणी प्रशांत फुले यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Onion Export News : कांदा निर्यातबंदी केंद्राने उठवली पण भाव वाढ होणार का?

IPL 2024, GT vs RCB Live Score: फाफ डू प्लेसिसने जिंकला टॉस, मॅक्सवेलचं झालं पुनरागमन; जाणून घ्या गुजरात-बेंगळुरूची प्लेइंग-11

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT