प्रस्तावित आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील सध्याची पोलिस ठाणी. 
पुणे

पोलिस आयुक्तालयाच्या कामांची आयुक्तांकडून पाहणी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय सुरू होण्याचे काउंटडाउन आता सुरू झाले आहे. पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी ठिकठिकाणी सुरू असलेल्या कामांची सोमवारी पाहणी केली.

ऑटो क्‍लस्टर येथील इमारतींमध्ये पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अतिरिक्त आयुक्त मकरंद रानडे आणि पोलिस उपायुक्त (मुख्यालय) विनायक ढाकणे यांची कार्यालये असणार आहेत; तर पोलिस उपायुक्त परिमंडळ तीन येथील कार्यालयात पोलिस उपायुक्त नम्रता पाटील आणि स्मार्तना पाटील यांची कार्यालये असणार आहेत. पिंपरी पोलिस ठाण्याच्या आवारात नियंत्रण कक्ष असणार आहे. या सर्व कामांची पाहणी पोलिस आयुक्तांनी सोमवारी केली; तसेच ऑटोक्‍लस्टर येथे महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेऊन चर्चा केली.अध्यादेशात मंजूर झालेली पदे आणि प्रत्यक्षात हजर असलेले मनुष्यबळ यांचा आढावा आयुक्तांनी घेतला. 

दरम्यान, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात बदली झालेले १७ पोलिस निरीक्षकही आयुक्तांसमोर हजेरी लावत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची जोरदार तयारी सुरू असतानाच पोलिस आयुक्त आणि उपायुक्त यांच्यासाठी निवासस्थानाची शोधमोहीम सुरू आहे. या अधिकाऱ्यांसाठी प्राधिकरण परिसरात रिकाम्या बंगल्याचा शोध पोलिस घेत आहेत.

ग्रुपवरून सूचना
पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलिस अधिकाऱ्यांना कामाची विभागणी करून दिली आहे. कामाबाबत काही अडचणी आल्यास त्या मांडण्यासाठी सहायक आयुक्तांपासून पुढील अधिकाऱ्याचा व्हॉट्‌सॲप ग्रुप तयार केला असून, त्याद्वारे अधिकाऱ्यांना आयुक्त सूचना करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Rain Update: कर्जतमध्ये भीषण घटना! 30 वर्षे जुना बंधारा फुटला; डोळ्यांसमोर पाण्याचा रौद्रअवतार

Dowry Death Law : पतीच्या दबावात पत्नीने माहेरच्या संपत्तीत हिस्सा मागणे म्हणजे हुंडाच; उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

Latest Marathi News Live Update : मध्य रेल्वेची बदलापूर ते मुंबई रेल्वे सेवा धिम्या गतीने सुरु

Satara Electric Shock: हृदयद्रावक दुर्घटना! फलटण तालुक्यात विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; एकाला वाचवायला धावले अन्..

'पाळी आलेली आणि ९ तास वॉशरुमलाही गेले नाही' ट्राफिकमध्ये अडकलेली मराठी अभिनेत्री, म्हणाली...

SCROLL FOR NEXT