Crime News esakal
पुणे

पुण्यात पोलिसानेच दिली सहकारी पोलिसाला मारण्याची सुपारी

सकाळ डिजिटल टीम

पुण्यात पोलिसाकडूनच सहकारी पोलिसाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

पुणे - पुण्यात (Pune) पोलिसाकडूनच सहकारी पोलिसाला मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगारालाच यासाठी सुपारी देण्यात आली होती. दत्तवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पोलिस अंमलदार नितिन दुधाळ याने सहकारी पोलिसाला मारण्याची सुपारी एका गुन्हेगाराला दिली होती. याप्रकऱणात योगेश प्रल्हाद अडसुळ (Yogesh Adsul) याला अटक करण्यात आली आहे. तर पोलिस अंमलदार नितीन दुधाळ फरार झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक स्वप्निल बाळासो लोहार (Swapnil Balaso Lohar) यांनी तक्रार दाखल केली आहे. नोव्हेंबर २०२१ पासून हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

पोलिस कर्मचारी नितीन दुधाळ (Nitin Dudhal) हा फरासखाना पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्यात असणारे पोलिस कर्मचारी त्याच्या शेजारीच राहत होते. त्यांच्यात काही कारणाने वाद झाला होता. याचाच राग मनात धरून नितीन दुधाळ याने योगेश अडसूळ या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला सुपारी दिली होती. अडसुळ याने दत्तवाडीतील एकाला हाताशी धरून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याची सर्व माहिती काढण्यासाठीसुद्धा सांगितले होते.

दरम्यान, पोलिस कर्मचाऱ्याची सुपारी दिल्याची माहिती दत्तवाडी पोलिसांना समजली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हेगाराला ताब्यात घेतलं. त्याला अडसुळने १० हजार रुपये दिले असल्याचंही सांगितलं. पोलिस कर्मचाऱ्याचा पाठलाग करून त्याचा अपघात करण्याचा कट रचल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर पोलिसांनी अडसुळला अटक केली. आता सध्या नितीन दुधाळचा शोध पोलिस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pancard Update : एक चूक अन् 1 जानेवारी 2026 पासून तुमचं पॅन कार्ड होईल बंद..आत्ताच करून घ्या 'हे' एक काम, नाहीतर होईल मोठं नुकसान

Ranji Trophy 2025 : यशस्वी जैस्वालने झळकावले शतक; मुंबईचा पराभव टाळण्यासाठी ठोकला शड्डू, मुशीरची फिफ्टी, अजिंक्य अपयशी

Latest Marathi News Live Update : पुणे रेल्वे स्थानकासमोरील अतिक्रमणांवर कारवाई, वाहतूक कोंडी कमी होणार

मलायकाचा बॉयफ्रेंड? फिटनेस क्वीनसोबत दिसणारा तो मिस्ट्री मॅन कोण? अभिनेत्रीपेक्षा 17 वर्षांनी आहे लहान

Pune News: ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’, भरधाव वेगामुळे अपघात; बंडगार्डन मेट्रो स्थानकाजवळील घटनेबाबत पोलिसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT