पुणे

मंगेश पालवे टोळीवर ‘मकोका’

CD

पौड, ता. १ : मुळशी तालुक्यातील रिहे-मोरेवाडी भागात दहशत पसरवणाऱ्या मंगेश पालवे आणि त्याच्या इतर चार साथीदारांवर ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली. ही माहिती हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांनी दिली.
मंगेश नामदेव पालवे, अथर्व नितीन मोरे, हर्षद संतोष मोरे, गणेश सुनील मोरे (सर्व रा. मोरेवाडी रिहे ता. मुळशी) आणि योगेश प्रकाश देवकर, ( रा. धानोरी पुणे, मूळ रा. होंबळ सांगवी, ता. आष्टी) अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. गावातील नागरिकांना मारहाण करणे, वाहने फोडणे, नागरिकांच्या अंगावर पिटबुल जातीचे कुत्रे सोडणे या गुन्ह्यात त्याला अटक होऊन त्याच्यावर यापूर्वीही ‘मकोका’अंतर्गत कारवाई झाली होती. त्यातून त्याला जामीन झाला होता. बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा मोरेवाडीतील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करायला सुरुवात केली. काही महिला, पुरुषांना मारहाण केली होती. या वेळी मोरेवाडीतील नागरिकांनी एकवटून पौड पोलिस ठाणे येथे येऊन त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलिस अधीक्षक डॉ. भूषण कुमार, हवेलीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पौडचे निरीक्षक संतोष गिरीगोसावी, सहाय्यक निरीक्षक संदीप चव्हाण, पोलिस हवालदार प्रशांत बुनगे, हनुमंत शेंडगे, गणेश पवार, अल्ताब हवालदार, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक फौजदार महेश बनकर यांनी पाचही जणांना अटक करून त्यांच्यावर ‘मकोका’ची कारवाई करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIRAT KOHLI: विराट कोहलीचा सराव सुरू, न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेचा थरार कधी रंगणार? जाणून घ्या ५ सामन्यांचं संपूर्ण वेळापत्रक

Manoj Jarange Patil : ५०० कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही; मनोज जरांगेंचा फडणवीस, शिंदेंना तपासाचे आव्हान

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात मुसळधार पावसाला सुरुवात, नारळाचं झाड वाहनांवर कोसळलं

''गेल्या दोन दिवसांपासून आम्ही...''; ५०० कोटींच्या कथित ऑडियो क्लिपबाबत श्रीकांत शिंदे पहिल्यांदाच बोलले, काय म्हणाले?

IND vs NZ 2nd T20: ६ चेंडूंत ११ धावा, शेवटच्या चेंडूपर्यंत थरार! तिलक-नितीशने पलटवला सामना, भारताचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय!

SCROLL FOR NEXT