पुणे

पोलीस कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तिघे निलंबित करमाळा पोलीस ठाण्यातील पीएसआय आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलवर कारवाई; सीआयडीकडून तपास सुरू

CD

कोठडीतील आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तिघे पोलिस निलंबित
करमाळा पोलिस ठाण्यातील पीएसआयसह दोन कॉन्स्टेबलवर कारवाई; सीआयडीकडून तपास सुरू

करमाळा, ता. २८ : पोलिस कोठडीत स्वतःला जखमी करून घेतलेल्या कृष्णा ज्ञानदेव मोहिते (वय ३८, रा. सांगवी) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकासह (पीएसआय) दोन पोलिस कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सीआयडीमार्फत सुरू असून, तपास अधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर वरिष्ठांनी ही कारवाई केल्याचे समजते.
मोहिते याच्याविरुद्ध त्याच्या नातेवाईक असलेल्या एका महिलेने पोक्सो कायदा आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी त्याला अटक केली होती.
पोलिस कोठडीतील पहिल्याच दिवशी, २० ऑक्टोबरला मोहिते याने भिंतीवर डोके आपटून स्वतःला जखमी करून घेतले. त्याला प्रथम करमाळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील उपचारांसाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना २३ ऑक्टोबर रोजी त्याचा मृत्यू झाला.
कोठडीतील आरोपीच्या मृत्यूची गंभीर दखल घेऊन सीआयडीमार्फत तपास सुरू करण्यात आला आहे. मृत्यूच्या परिस्थितीसह संबंधित पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जात आहे.
घटनेच्या दिवशी कर्तव्यावर असलेले पीएसआय उघडे आणि पोलिस कॉन्स्टेबल रंदील व कादगे या तिघांना निलंबित करण्याची शिफारस तपास अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचे समजते. मोहिते याचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, हे सीआयडीच्या तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नागपूर पदवीधर निवडणूक; दुसऱ्या पसंतीच्या मतांमध्ये वंजारींची मुसंडी; महायुतीच्या कोहळेंचे मताधिक्य केले सर; निकालाकडे राज्याचं सर्वांचे लक्ष

Mumbai Night Cab Viral Video : "आज मला पुरुष असल्यासारखं वाटलं!"; पहाटे २ वाजता मुंबईत उतरलेल्या तरुणीने 'त्या' कॅबमधून प्रवास केला अन्... व्हिडिओ तुफान व्हायरल!

Mumbai News : वाराणशीतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांसाठी मदतीचा हात; काशी महाराष्ट्र सेवा समितीचा पुढाकार

WPL 2027 Auction : सोफी मॉलिनेक्स ठरली महागडी खेळाडू... मुंबई इंडियन्स, RCB चे तगडे संघ तयार; जाणून घ्या सर्व संघांची लिस्ट...

Marathi News Live Updates : वाचा दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT