Police esakal
पुणे

Baramati Police : बारामती विभागात पोलिसांचा तक्रारनिवारण दिन सुरु होणार

पोलिस विभागाविषयीच्या विविध तक्रारींचे निराकरण प्रभावीपणे करण्याच्या उददेशाने बारामती हद्दीमध्ये तक्रार निवारण दिन सुरु होणार आहे.

मिलिंद संगई,

पोलिस विभागाविषयीच्या विविध तक्रारींचे निराकरण प्रभावीपणे करण्याच्या उददेशाने बारामती हद्दीमध्ये तक्रार निवारण दिन सुरु होणार आहे.

बारामती - पोलिस विभागाविषयीच्या विविध तक्रारींचे निराकरण प्रभावीपणे करण्याच्या उददेशाने बारामती हद्दीमध्ये तक्रार निवारण दिन सुरु होणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे यांनी या बाबत माहिती दिली. मंगळवारी (ता. 2) सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत माळेगाव पोलिस ठाण्यात पहिला तक्रार निवारण दिन होणार आहे. स्वताः आनंद भोईटे तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेणार आहेत.

नागरिकांच्या विविध समस्या, तसेच तक्रारींचे निराकरण प्रभावीपणे व वेळेत व्हावे, प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेतले जावे व त्यांच्या तक्रारीत तथ्य असेल तर त्या वर योग्य ती कायदेशीर कार्यवाही व्हावी या उदेदशाने हा तक्रार निवारण दिन सुरु करण्यात येत असल्याचे आनंद भोईटे यांनी नमूद केले.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे.

बारामती अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीत बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर या 5 तालुक्यातील 13 पोलीस स्टेशन येतात. सर्वच ठिकाणी असे तक्रारनिवारण दिन आयोजित केले जाणार आहेत.

ज्यांचे गुन्हे, अर्ज, अदखलपात्र गुन्हे या बाबत योग्य कारवाई झाली नाही, अवैध धंदे, गुंडागर्दी, महिला सुरक्षा, याविषयी तक्रारी असतील किंवा काही ठिकाणी पोलीस कर्मचा-यांविरुद्ध तक्रारींबाबत तक्रार निवारण दिनी नागरीकांनी थेट वरीष्ठ अधिकाºयांना भेटता येणार आहे.

माळेगाव पोलीस स्टेशन नवीन इमारत हॉलमध्ये तक्रार निवारण दिनाची सुरवात होईल. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी त्यांच्या तक्रारींबाबत स्वताः उपस्थित राहून सूचना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अजित पवार यांच्याही सूचना...

दरम्यान माझ्या शेजारी बसलेला का असेना तो अयोग्य कामे करत असेल तर त्याला सोडू नका, कारवाई करा, अशी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. दहशत माजविण्याचा कोणी प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करा असेही पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

Khutbav News : शेतकरी महिलेने शेतीकाम करत मराठी साहित्य क्षेत्रामध्ये वाजवला गौरवाचा डंका

SCROLL FOR NEXT