Boat Sakal
पुणे

पोलीसांनी वाळू उपसा करणाऱ्या ४० लाख रुपयांच्या बोटी केल्या उध्वस्त

अवैध वाळू उपसा करणाऱ्या ४० लाख रुपयांच्या ४ फायबर बोटी व एक सक्शन बोट जिलेटीनच्या साहाय्याने केल्या उध्वस्त.

डॉ. संदेश शहा

इंदापूर - पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला उजनी जलाशयामध्ये गस्त घालण्यासाठी स्पीड बोट (Speed Boat) दिल्यानंतर पहिल्याच दिवशी इंदापूर पोलीसांनी (Police) धडक कारवाई (Crime) करत अवैध वाळू (Illegal Sand) उपसा करणाऱ्या ४० लाख रुपयांच्या ४ फायबर बोटी व एक सक्शन बोट जिलेटीनच्या साहाय्याने उध्वस्त (Devastated) केल्या.

तहसीलदार अनिल ठोंबरे व महसूल कर्मचारी तसेच इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या नेतृत्वाखालील फिरत्या गस्ती पथकाने ही थेट कारवाई केली. सलग दहा दिवसातील ही तिसरी कारवाई असून यामुळे अवैध वाळू माफियांचे धाबे दणाणले आहे.

या कारवाईत पोलीस नाईक गणेश झरेकर, पोलीस शिपाई समाधान केसकर, अमोल गारुडी, लिंगदेव नवले, सुरज कदम, शर्मा पवार, पोलीस पाटील राजेंद्र शिंदे यांनी भाग घेतला. इंदापूर तहसिल कार्यालयात पदभार घेण्यासाठी येणारे सिंघम तहसीलदार श्रीकांत पाटील यांच्या स्वागतासाठी ही कारवाई केल्याची चर्चा उजनी पाणलोट क्षेत्रात रंगली.

यावेळी पोलीस निरीक्षक श्री. गोडसे म्हणाले ,जोपर्यंत उजनी जलाशयामध्ये अवैध वाळू उपसा होईल, तोपर्यंत आमची कारवाई सुरूच राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT