पुणे

कोरोना नव्हे तर, 'या' कारणामुळे पोलिस हैराण

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : कोरोना विषाणूंच्या वाढता संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आलेली असतानाच डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरातील सहा स्पॉट पोलिसांना नाकाबंदी करण्यासाठी त्रासदायक ठरत असल्याचे समोर आले आहे. 

डासांच्या वाढत्या त्रासामुळे संध्याकाळी सहा ते पहाटे सहा यावेळेत काम करणारे पोलिस कर्मचारी हवालदिल झाले असून, डासांपासून बचाव करण्यासाठी त्यांना अनेक उपाय करावे लागत आहे. 

ही आहेत ठिकाणे

शहरातील दापोडी, बोपोडी, चिंचवड परिसरातील गणेश विसर्जन घाट, रावेत परिसरातील भोंडवे कॉनर्र, भोसरी परिसरातील बनाचा ओढा परिसर आणि मोशी टोलनाका परिसरात असणाऱ्या नाकाबंदीच्या ठिकाणांवर संध्याकाळी सहानंतर तपासणीचे काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, डासांच्या त्रासापासून सुटका करुन घेण्यासाठी ड्युटीवर असणारे पोलिस कर्मचारी ओडोमॉस क्रिमचा वापर करणे, परिसरात लाकडे जाळून धूर करणे, पंखा लावणे अशा प्रकारचे उपाय करत आहेत. मात्र, डासांच्या त्रासापासून त्यांची सुटका होत नसल्याने रात्रीच्या वेळेत काम करणारे कर्मचारी हैराण झाले आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यामुळे वाढलेत डास 

नाकाबंदी करण्यासाठी असलेले हे सहा स्पॉट नदीलगतच्या परिसरात आहेत. गेल्या काही दिवसांपासून पवना, मुळा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डास वाढले आहेत. कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे महापालिका प्रशासनातल्या आरोग्य विभागातील कर्मचारी त्याच कामामध्ये गुंतले आहेत. त्यामुळे नदीमधील जलपर्णी काढण्याकडे लक्ष दिले जात नसल्यामुळे ही समस्या वाढली आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, नदीमधील जलपर्णी काढून टाकावी, त्या लगतचा परिसर स्वच्छ ठेवावा, डास असणाऱ्या परिसरात औषधांची फवारणी करणे असे उपाय महापालिका प्रशासनाने तत्काळ करणे अपेक्षित आहे, त्यामुळे या भागातील डास कमी होतील आणि नाकाबंदीचे काम करणे पोलिसांना सुसह्य होईल, अशी भावना या परिसरात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांनी व्यक्‍त केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं जाणून घ्या

Viral Video: शिक्षिकेला शाळेत उशिरा येणे पडलं महागात, मुख्याध्यापिकेने केली मारहाण, कपडेही फाडले

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT