Police give punishment to 48 people including former mayor for morning walk during lockdown 
पुणे

माजी महापौरांसह 48 जणांना पोलिसांनी बनवला कोंबडा; व्हिडिओ पाहाच

सकाळवृत्तसेवा

पिंपरी :  मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या नागरिकांवर पोलिसांनी शनिवारी (ता. 18) पुन्हा कारवाईचा बडगा उगारला. निगडी पोलिसांनी 35 नागरिकांना परेड, सूर्यनमस्कार तसेच आदेशाचे उल्लंघन न करण्याची शपथ घेण्याची शिक्षा केली. यामध्ये एका माजी महापौरांचाही समावेश आहे. तसेच मोशी, प्राधिकरण येथे गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने नियम मोडणाऱ्या 13 जणांना कोंबडा होण्याची शिक्षा केली. 

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घराबाहेर पडू नका, असे वारंवार आवाहन करूनही अनेकजण रस्त्यावर येत आहेत. यामध्ये मॉर्निंग वॉक साठी घराबाहेर पडणाऱ्यांचेही प्रमाण अधिक आहे. निगडी पोलिसांनी शुक्रवारी दहा जणांवर कारवाई केली होती. अशीच कारवाई निगडी, प्राधिकरण परिसरात शनिवारीही करण्यात आली. 35 जणांना परेड, सूर्यनमस्कार व यापुढे सरकारी आदेशाचे उल्लंघन करणार नाही, अशी शपथ घेण्याची शिक्षा करण्यात आली. 

तर मोशीतील प्राधिकरण परिसरात 13 जणांवर गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाने कारवाई केली. नियम मोडणाऱ्याना कोंबडा होण्याची शिक्षा केली. या सर्व नागरिकांवर कमल 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara Morcha: बंजारा समाजाच्या मोर्चात धनंजय मुंडेंना विरोध; वंजारा-बंजारा एक असल्याच्या विधानाचा निषेध

Nepal Sushila Karki Government : नेपाळच्या सुशीला कार्की सरकारचा मोठा निर्णय! आंदोलनात जीव गमावलेल्या ‘Gen-Z’ ना शहीद दर्जा!

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध विजयानंतर भारताच्या सायलंट किलरला मिळालं 'इम्पॅक्ट प्लेअर' मेडल; पाहा ड्रेसिंग रुममधील Video

Pratap Sarnaik : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक दुचाकी, टॅक्सी सेवेसाठी भाडेदर निश्चित; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

Latest Marathi News Updates : सर्वसमावेशक कर्करोग धोरण तयार करण्याचे सरकारचे निर्देश

SCROLL FOR NEXT