पुणे

#PunePolice पोलिस देणार  स्मार्ट  रिस्पॉन्स

मंगेश कोळपकर

पुणे - एखादी घटना घडल्यावर आणि पोलिसांची गरज भासली, तर पोलिस तेथे पोचण्याचा सध्याचा ‘रिस्पॉन्स टाइम’ आता १२ ते १५ ऐवजी ७ ते ९ मिनिटांवर आणण्यासाठी शहर पोलिसांनी पावले उचलली आहेत. त्यासाठी क्राइम कंट्रोल व्हॅन्स, बीट मार्शल आणि पेट्रोलिंग मोबाईल व्हॅन्सला ‘जीपीएस’ बसविण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे आयुक्तालयातील डिजिटल मॅपवरून कोणते पोलिस कोठे आहेत आणि त्यांनी कोठे पोचायचे, याची सूचना त्यांना क्षणार्धात मिळणार आहे.  

जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न अथवा हाणामारीची घटना घडल्यावर नागरिक मदतीसाठी पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करतात. तेव्हा कक्षातून वॉकीटॉकीच्या माध्यमातून गस्तीवरच्या पोलिसांना सूचना दिली जाते अन्‌ ते तेथे पोचतात. शहर पोलिसांचा सध्याचा रिस्पॉन्स टाइम १२-१५ मिनिटे आहे. तो पहिल्या टप्प्यात ७ ते ९ मिनिटांवर आणण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी ‘जीपीएस’चा प्रकल्प हाती घेतला असून, अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याची अंमलबजावणी सुरू आहे. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त दीपक हुंबरे यांनी दिली. 

नेमके काय होणार ? 
 शहरात प्रत्येक पोलिस ठाण्यांतर्गत ३ ते ५ मोटारसायकलवरील पोलिस 
(बीट मार्शल आहेत) अशा २४४ वाहनांना जीपीएस बसविण्यात आले आहे
 शहरातील प्रमुख ३० ठिकाणी कंट्रोल रूमची व्हॅन आहे. त्यांनाही जीपीएस बसविण्यात आले आहे. 
 ‘दामिनी’अंतर्गत प्रत्येक पोलिस ठाण्यात एक मोटारसायकल महिला पोलिसांना गस्तीसाठी देण्यात आली आहे. त्यांनाही जीपीएस बसविण्यात आले आहे.

पुढील टप्प्यात  हे होणार 
  शहरातील सर्व म्हणजे ३० पोलिस ठाण्यांत पोलिस निरीक्षकांच्या ६० जीपला जीपीएस बसविण्याची प्रक्रिया अल्पावधीत सुरू होणार. त्यामुळे पोलिस निरीक्षकांचेही लोकेशन आयुक्तालयात उपलब्ध होणार 

  शहरात गस्तीवरच्या सुमारे 
२५ व्हॅन्स आहेत. त्यातही जीपीएस बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

‘रिअल टाइम’ लोकेशन मिळाल्यावर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोचून नागरिकांना मदत करणे अपेक्षित आहे. त्यासाठी हा प्रकल्प हाती घेतला असून, तो अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात आला आहे. त्यातून शहरात २४ तास व्हिजिबल पोलिसिंग होईल.
-डॉ. के. व्यंकटेशम, पोलिस आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा M. Chinnaswamy Stadium वरील हा शेवटचा सामना कसा? नेमकी भानगड काय? Explained

IPL 2026 Point Table: विराट कोहलीचे शतक हुकले, देवदत्त पडिक्कलने चागंलेच झोडले; RCB चा घरच्या मैदानावरील शेवटच्या लढतीत विजय

Paytm Bank: पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रद्द! वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार? पेमेंट करता येणार का? जाणून घ्या...

Manohar Mama Arrested: आणखी एका बाबाला अटक! स्वतःला बाळूमामाचा अवतार सांगायचा; कुर्डुवाडीत गुन्हा दाखल

RCB vs GT Live: विराट कोहलीने इतिहास रचला! IPL मध्ये असा पराक्रम करणारा पहिलाच फलंदाज ठरला; गेल, रोहितच्या यादीत स्थान

SCROLL FOR NEXT