Swapnil Garad esakal
पुणे

Swapnil Garad : "गड आला पण सिंह गेला" एव्हरेस्ट सर करणाऱ्या काँस्टेबलसाठी विश्वास नांगरेंची भावूक पोस्ट

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी "गड आला पण सिंह गेला" असे कॅप्शन लिहत गरड यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय.

सकाळ ऑनलाईन टीम

Swapnil Garad : एव्हरेस्ट सर यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर स्वप्निल गरड यांना अतिउंचीवरील विकाराने ग्रासले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र त्यांना अपयश आले. गडावर यशस्वी पोहोचणाऱ्या या सिंहाचा मृत्यू झाला. पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी "गड आला पण सिंह गेला" असे कॅप्शन लिहत गरड यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केलाय.

पण हा आनंद नियतीला मान्य नव्हता. आईसाठी, तुझ्या लाडक्या लेकीसाठी. रुग्णालयात आल्यावर तू एकदाच डोळे उघडून पाहिलंस, माझ्या सिंहा, ऊठ जायचं आता आपल्या घरी, आले बघ तुला न्यायला असे म्हटल्यानंतर तू डोळ्यातून पाणी काढले होते.

व्हिडिओ कॉलवर आई, लेक स्वर्णिका आणि पत्नीच्या हाकेला साद दिली होतीस. त्यांच्यासाठी तू जायचं नव्हतं रे...’’ गिर्यारोहक स्वप्नील आदिनाथ गरड यांच्या अंत्यसंस्काराच्यावेळी त्यांची शोकाकूल बहिण आरती हिचे दुःखाचे हे शब्द उपस्थितांना हेलावून सोडणारे ठरले.

एव्हरेस्ट मोहीम यशस्वी केल्यानंतर गरड यांना अतीउंचीवरील विकाराने ग्रासले. नेपाळमधील काठमांडूत त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण त्यांची झुंज अपयशी ठरली. यामुळे गरड कुटुंबावर काळाने पुन्हा घाला घातला.

वडीलांच्या अपघाती निधनानंतर ते अनुकंपा तत्त्वावर पोलिस दलात भरती झाले होते. ते मुंढव्यातील लोणकर विद्यालयात शिकले. गरड यांनी हे पर्यावरणरक्षणासाठी नेहमी सायकलचा वापर केला. ते इतरांना सायकल वापरण्याचा सल्ला देत.त्यांनी उत्तराखंडमधील नेहरू पर्वतारोहण संस्थेतून बेसिक कोर्स, तर सिक्कीममधील संस्थेतून अॅडव्हान्स कोर्स केला. त्यांनी सहा शिखरांच्या मोहिमा यशस्वी केल्या. (Everest)

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

स्वप्नील यांच्या पार्थिवावर मुंढवा येथील स्मशानभूमीत रविवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख, अश्विनी राख, सुहेल शर्मा, सहायक आयुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या उपस्थितीत त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. या वेळी पोलिस दलाच्या जवानांनी त्यांच्या सन्मानार्थ बंदुकीतून हवेत फैरी झाडून मानवंदना दिली. (Vishwas Nagre Patil)

स्वप्नील गरड धाडसी पोलिस कर्मचारी होते. एव्हरेस्ट केल्यानंतर प्रकृती बिघडून त्यांचे निधन होणे वेदनादायक आहे. त्यांच्या निधनाने पुणे शहर आणि महाराष्ट्र पोलिस दलाचे नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना शहर पोलिस दलाकडून आवश्यक साहाय्य करण्यात येणार आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याला अनुकंपा तत्त्वावर भरतीसाठी पूर्ण सहकार्य करण्यात येईल.

— रितेश कुमार,

पोलिस आयुक्त, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Taxi Cab Service : ‘ओला-उबर’ला मिळणार जबरदस्त टक्कर!, देशभरात आजपासून ‘भारत टॅक्सी’ कॅब सेवा सुरू

New York: न्यूयॉर्क शहराला मिळाला पहिला मुस्लिम महापौर; कुराण हातात घेऊन घेतली शपथ

KYV Process: वाहनधारकांना मोठा दिलासा! FASTag नियमात महत्त्वाचा बदल; डिजिटल टोल व्यवस्थेत सुधारणा

Video Viral: आईsss शप्पथ... हा तर स्विंगचा किंग! याच्या गोलंदाजीचा सामना करताना भल्याभल्यांना फुटेल घाम...

'बिग बॉस मराठी ६' मध्ये होणार 'या' अभिनेत्रीची एंट्री; रितेश देशमुखसोबत केलंय काम; कोण आहे ती?

SCROLL FOR NEXT