police
police 
पुणे

अन् यामुळे ज्येष्ठाच्या डोळ्यात...

सकाळवृत्तसेवा

हडपसर : कोरोनोच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्ताचा ताण असतानाही कर्करोगाने ग्रस्त वृध्द नागरिकाला हडपसर पोलिसांनी औषधे उपलब्ध करुन दिल्याने वृध्दाच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. संचारबंदीच्या काळात पोलिसांमधील माणुसकीचे दर्शन घडल्याने वृध्दाने पोलिसांना धन्यवाद दिले, तसेच पोलिसांच्या रूपाने देव धावून आल्याची भावना ‘सकाळ'शी बोलताना व्यक्त केली. 

मांजरी ग्रीन वूड सोसायटीत सेना दलातून निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक आर. सिन्हा राहतात. ते कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यांची नियमीत घ्यावयाची औषधे संपली होती. ते घरी एकटेच राहत असल्यामुळे औषधे कशी आणावयाची, याची चिंता त्यांना सतावत होती. अखेर त्यांनी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांना फोन केला व सर्व हकीकत सांगितली. त्यांनतर तातडीने साठे यांनी सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे यांना सिन्हा यांच्या मदतीला पाठवले. 

लोणारे यांच्यासह हवालदार अनिल कुसाळकर, ज्ञानेश्र्वर चित्ते, पोलिस मित्र राहूल तुपे यांनी सिन्हा यांच्याकडून माहिती घेतली असता सदर औषधे ही केवळ स्वारगेट येथील सामुदायिक स्वास्थ्य केंद्रात मिळत असल्याचे समजले.

इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

लोणारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ स्वारगेट येथे जाऊन माहिती घेतली असता डॉक्टरांनी औषधे पोलिसांकडे देण्यास नकार दिला. औषधांची किंमत सुमारे सहा लाख असुन, ते सेनादलातून निवृत्त असल्याने ती त्यांना मोफत दिली जातात. मात्र ही औषधे घेण्यासाठी संबंधित व्यक्तीच लागेल, असे त्यांना सांगण्यात आले.

संबधित व्यक्ती ज्येष्ठ नागरिक असुन, आजारी आहेत, घरी ते एकटेच राहतात, अशी पोलिसांनी विनंती केली. त्यानंतर सिन्हा यांच्या सहीचे परवानगी पत्र दिल्यास, ‘आमच्या संचालकांना विचारून ती औषधें तुमच्याकडे देऊ शकतो,' असे सांगण्यात आले. पोलिस पुन्हा मांजरीत येऊन सिन्हा यांच्याकडून परवानगी पत्र घेऊन परत स्वास्थ्य केंद्रात गेले.

संचालकांनी परिस्थिती समजून घेऊन पोलिसांकडे औषधे दिली. औषधे मिळवून देण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांमुळे सिन्हा यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

SRH vs PBKS Live Score : हैदराबादचा डोळा दुसऱ्या क्रमांकावर; पंजाबचा नवा कर्णधार शेवट गोड करण्यासाठी उत्सुक

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

SCROLL FOR NEXT