पुणे

करमाळ्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधावी; मुख्यमंत्र्यांकडे आमदार नारायण पाटील यांची मागणी

CD

KOR26B10535
मुंबई : करमाळा येथे पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधण्यात यावी, या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देताना आमदार नारायण पाटील.
---
करमाळ्यात पोलिसांसाठी निवासी इमारत बांधावी
आमदार नारायण पाटील यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
करमाळा, ता. ४ : करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी व करमाळा पोलिस ठाणे अंतर्गत कार्यरत पोलिस कर्मचाऱ्यांसाठी निवासी इमारत बांधली जावी, अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मुंबई येथील मुख्यमंत्री कार्यालयात जाऊन आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत निवेदनही दिले आहे.
याबाबत माहिती देताना आमदार पाटील यांनी सांगितले, की करमाळा येथे उपविभागीय पोलिस अधिकारी व करमाळा पोलिस ठाणे या दोन्ही कार्यालयांमध्ये उच्चपदस्थ १० कर्मचारी व ११० पोलिस शिपाई कर्मचारी कार्यरत आहेत. करमाळा तालुक्याचे क्षेत्रफळ मोठे असून, करमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११८ गावांचा समावेश आहे. सद्य:स्थितीत पोलिस खात्याच्या मालकीच्या जागेत पोलिस कर्मचाऱ्यांकरिता सर्व्हे नं. ३९२८ मध्ये ब्रिटिशकालीन २३ निवासस्थाने बांधण्यात आली होती. या निवास स्थानाच्या इमारती ७० ते ८० वर्षांपूर्वीच्या असल्याने त्या धोकादायक, जीर्ण व मोडकळीस आलेल्या आहेत. संदर्भीय पत्रान्वये उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, करमाळा यांनी पोलिस निवास स्थानाची संरचनात्मक तपासणी केली असून, ते वापरण्यास योग्य नसल्याचे कळविण्यात आले आहे.
या इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये निवासस्थान निष्कासित करण्याबाबत सुचविले आहे. परंतु, अद्यापही काही पोलिस कर्मचारी या धोकादायक निवास स्थानांमध्ये राहात आहेत. पोलिस महिला व पुरुष कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांना निवासी इमारत नसल्याने गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागास ७० पोलिस कर्मचाऱ्यांकरिता नवीन अद्ययावत निवासी इमारत (वसाहत) बांधण्यासाठी अंदाजपत्रके सादर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT