पुणे

Takli news and photo

CD

ऑडिओप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी

पोलिस निरीक्षकांची पैसे मागणीची कथित ऑडिओ क्लिप

टाकळी ढोकेश्वर, ता. २२ पारनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी वाळू चोरीच्या प्रकरणात फिर्यादीतून नाव वगळण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप असलेली कथित ध्वनिफीत समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या ध्वनिफितीची उपविभागीय पोलिस अधिकारी शिरीष वमने चौकशी करणार असून, चौकशीनंतर पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना अहवाल सादर करण्यात येणार आहे.

नागापूरवाडी येथील मांडवा शिवारातील मुळा नदीपात्रातून बेकायदेशीररित्या वाळूचोरी केल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीचे नाव फिर्यादीत न टाकण्याच्या हमीवर दोन लाख रुपये देण्याबाबतचा कथित संवाद या ध्वनिफितीत असल्याचे सांगितले जात आहे. त्यापैकी एक लाख रुपये यापूर्वी दिल्याचे आणि उर्वरित एक लाख रुपये जमा करण्याबाबत संवाद झाल्याचाही उल्लेख त्यामध्ये असल्याचा दावा केला जात आहे.
दरम्यान, पोलिस निरीक्षक संतोष खेडकर यांनी ही ध्वनिफीत संपादित व मिश्रित असल्याचा दावा केला आहे. आपण कोणाकडेही पैशांची मागणी केलेली नाही. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या ध्वनिफितीतील संभाषणात फेरफार करण्यात आला असून, सत्य चौकशीत समोर येईल, असे त्यांनी सांगितले.
............
मी कोणाकडेही पैशांची मागणी केलेली नाही. समाजमाध्यमांवर प्रसारित झालेल्या ध्वनिफितीतील संभाषण संपादित करण्यात आले आहे.
- संतोष खेडकर, पोलिस निरीक्षक, पारनेर
........
ही ध्वनिफीत माझ्याकडे आली आहे. याबाबत चौकशी करून पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांना अहवाल सादर करण्यात येईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
- शिरीष वमने, उपविभागीय पोलिस अधिकारी, अहिल्यानगर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एल निनोचं रौद्ररूप येणार? शंभर वर्षांतील शक्तिशाली घटनांपैकी एक ठरण्याचा अंदाज, भारतासह जगाची चिंता वाढली

नवीन SIM घेणाऱ्यांसाठी मोठा बदल! फक्त KYC पुरेसं नाही, बायोमेट्रिक पडताळणी अनिवार्य

Kalamb News : मतदारांनी विरोधक निवडले; नगरसेवकांनी सत्ता! कळंबमध्ये बॅनरबाजीने राजकीय धुरळा

ST Service : ठाणे-गणपतीपुळे एसटीमुळे १४ गावांना दिलासा; आमदार संजय केळकरांच्या पाठपुरावयाला यश

Black Lung Disease: आजोबांचा आजार आता तरुणांना; अमेरिकेत वाढणारी ‘ब्लॅक लंग’ची प्रकरणं नेमकी आहेत तरी काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT