Pune-police.jpg 
पुणे

पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसमध्ये पोलिसांकडूनच प्रवाशांची लूट

सकाळ वृत्तसेवा

दौंड : पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांकडून बळजबरीने चौदाशे रुपये उकळणाऱ्या गस्त पथकातील लोहमार्ग पोलिसांविरुद्ध वरिष्ठ रेल्वे तिकीट परीक्षकाने तक्रार देऊन देखील संबंधितांवर कारवाई झाली नाही. कारवाई करण्याऐवजी संबंधित प्रवाशांवर एक्‍स्प्रेसमध्ये सिगारेट ओढल्याचा बनाव करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

पुणे-लखनौ एक्‍स्प्रेसने शुक्रवारी (ता. 23) संध्याकाळी पुणे रेल्वेस्थानक सोडल्यावर गस्तीवरील सहा लोहमार्ग पोलिसांपैकी दोघांनी नवाज हबीब शरीफ (वय 26) या प्रवाशाला मारहाण केली. गणवेशातील रेल्वे पोलिस नाईक गणेश जी. राठोड व त्याच्या एका सहकार्याने नवाज यास फरफटत स्वच्छतागृहाकडे ओढत नेले. तेथे नवाज याच्या मोबाईल फोनमध्ये अश्‍लील चित्रफीत असल्याचे सांगून कारवाई न करण्यासाठी बळजबरीने खिशातील चौदाशे रुपये काढून घेतले. सहप्रवाशांनी याची माहिती एक्‍स्प्रेसमधील तिकीट परीक्षकांनी दिली. त्यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. एक्‍स्प्रेस दौंड रेल्वेस्थानकावर दाखल होताच संबंधित प्रवासी, लोहमार्ग पोलिस व तिकीट परीक्षक रेल्वे स्थानक व्यवस्थापक कार्यालयात आले व त्यापैकी तिकीट परीक्षकांनी तक्रारपुस्तिकेत तक्रार नोंदविली. वरिष्ठ तिकीट परीक्षक शैलेश कुमार यांनी लोहमार्ग पोलिस जबरदस्तीने प्रवाशांकडून पैसे काढत असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. ही तक्रार दौंड लोहमार्ग पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आली. 

संबंधित प्रवासी हा सिगारेट ओढत होता, असा दावा गणेश राठोड याने लोहमार्ग पोलिसांकडे नोंदविलेल्या जबाबात केला आहे. रेल्वेच्या जबाबदार अधिकाऱ्याने तक्रार दिल्यानंतरही त्याची दखल न घेता पैसे लुटणाऱ्या पोलिसाला वाचविण्यासाठी काही वरिष्ठांनी हस्तक्षेप केल्याने या प्रकरणात कोणतीही कारवाई झाली नाही. 

प्रवाशाच्या तक्रारीनंतर कारवाई होणार 
याबाबत दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक दीपाली भुजबळ यांना आज विचारले असता त्या म्हणाल्या, "याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे व चौकशी सुरू आहे. संबंधित प्रवाशांशी मोबाईलवरून संपर्क साधला असता त्यांनी 10 ते 15 दिवसांनी परत येणार असल्याचे सांगितले असून, त्यांची स्वतंत्र तक्रार प्राप्त होताच चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे १३ दिवसांपासून निर्यात बंद; जेएनपीए बंदरात कंटेनर अडकले, शिपिंग कंपन्यांवर खंडणीचा आरोप, प्रकरण काय?

विराट, रोहित यांच्या निवृत्तीला तू जबाबदार? Gautam Gambhir म्हणाला, मागील १८ महिन्यांत माझ्याकडून चुका झाल्या, ज्या...

Share Market Close : आज शेअर बाजार हिरव्या रंगात बंद! सेन्सेक्स ९३९ अंकांनी वधारला तर निफ्टी २५८ अंकांनी वर, कोणते शेअर्स फायद्यात? पाहा

अरे तो वाघ आहे...! विदर्भात लोकांचा मुर्खपणा, मोबाईल कॅमेरा घेऊन जंगलच्या राजाचा पाठलाग, VIDEO VIRAL

Latest Marathi Update : जळगावमधील साईबाबा मंदिरातील भक्तनिवासाचा स्लॅब कोसळल्यामुळे ७ कामगार जखमी

SCROLL FOR NEXT