police  
पुणे

Bharat Bandh: पुण्यात पोलिसांच्या संवादाने आंदोलन शांततेत

सकाळवृत्तसेवा

पुणे- दिल्लीतील शेतकरी आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी पुकारलेल्या ‘भारत बंद’ आंदोलनासाठी शहरात ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर सहपोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिवसभर आंदोलकांशी योग्य समन्वय व संवाद सुरू ठेवल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार न घडता आंदोलन शांततेत पार पडले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्ष, सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने मंगळवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांत आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या ठिकाणांसह शहरातील प्रमुख रस्ते, प्रमुख चौकांसह महत्त्वाच्या ठिकाणांवर दिवसभर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शहरातील सर्वांत मोठे आंदोलन टिळक चौकामध्ये झाले. या आंदोलनासह कोंढवा, कोथरूड, वारजेसह अन्य पाच ते सात ठिकाणी झालेल्या आंदोलनावर पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले होते. आंदोलन शांततेत व लोकशाही मार्गाने पार पाडावे, 

यासाठी पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांशी समन्वयाबरोबर संवाद सुरू होता.  डॉ. शिसवे म्हणाले, ‘‘आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर आंदोलनकर्ते पक्ष व संघटनांशी आमचे काही दिवसांपासून सातत्याने बोलणे सुरू होते. त्यानुसार, त्यांच्याकडूनही शांततेत आंदोलन करण्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला होता. त्यादृष्टीने पुणे पोलिसांनी योग्य नियोजन केले होते. मंगळवारी दिवसभर शहरात पाच ते सहा ठिकाणी आंदोलने झाली. संबंधित ठिकाणी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडलेली नाही. आंदोलकांशी समन्वय ठेवल्यामुळे आंदोलन शांततेत पार पडले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT