पुणे

पोलिस अधिकाऱ्यास बघून घेण्याची धमकी

CD

पोलिस अधिकाऱ्यास बघून घेण्याची धमकी
सोलापूर : दारू पिल्यानंतर बिला कारणावरून काहीजण एकमेकांशी झोंबाझोंबी, हाणामारी करीत होते. त्यांचा वाद मिटवायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यालाच चौघांनी दमदाटी केली. अरेरावी करून त्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी चौघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. बुधवारी (ता. २४) मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास मजरेवाडी क्रॉस रोड परिसरातील अनिश बिअर बारमध्ये चौघेजण दारू पिले. वादाचे रूपांतर झटापटीत झाले आणि हाणामारी सुरू झाली. पोलिस घटनास्थळी येताच चौघांनी पोलिसांशीच अरेरावी सुरू केली. जोरात ढकलून देऊन ‘तुला बघून घेईन’ अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिस हवालदार वाघमारे यांनी फिर्याद दिली. त्यावरून सिध्दाराम सुभाषय्या स्वामी, महेश शिवपुत्र हिचगे, सागर श्रीकांत हत्तुरे व अनिकेत शंकर बनसोडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्रप्रसाद वाघमारे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: आज मोहरमनिमित्त बँका बंद की सुरू? पाहा RBI ची अपडेट, सलग 3 दिवस...

Bhiwandi Minor Assault Case : भिवंडीत संतापजनक घटना! ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, आरोपीने फ्लॅटमध्ये बोलावले अन्...

Shocking Video: अंत्यसंस्कार केले, तेरावाही झाला अन् खुनाचा गुन्हाही दाखल केला... पण त्याच व्यक्तीने अचानक घराचा दरवाजा ठोठावला!

Tukaram Mundhe: विधानसभेत मोठी घोषणा; FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली नाही, भेसळ माफियांना धक्का!

Nashik Tourism : नाशिकच्या 'या' प्रसिद्ध पर्यटनस्थळांवर रील बनवण्यास आणि सेल्फी घेण्यास बंदी! उल्लंघन केल्यास कारवाई; हरिहरगडावर दिवसाला 300 पर्यटकांनाच प्रवेश

SCROLL FOR NEXT