पोलीस कार्यालये ही जनतेच्या सेवेसाठीच; अमिताभ गुप्ता sakal
पुणे

पोलीस कार्यालये ही जनतेच्या सेवेसाठीच; अमिताभ गुप्ता

वानवडी सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन

सकाळ वृत्तसेवा

कात्रज : पोलिस स्टेशन किंवा पोलिसांसाठी बनवण्यात आलेली सर्व कार्यालये हे जनतेच्या सेवेसाठीच असतात आम्ही अधिकारी फक्त दोन वर्षासाठी ती सांभाळत असतो. ही कार्यालये मोठी, देखणी व स्वच्छ असावीत अशी अपेक्षा पुणे पोलीस (pune police) आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी व्यक्त केली. कात्रज-कोंढवा (katraj kondhava) रस्त्यावरील खडीमशीन चौकी शेजारीच बनवलेल्या वानवडी सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज (ता. १०) मंगळवारी करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. (Police offices are for public service only amitabh gupta)

यावेळी पोलिस सह आयुक्त रविंद्र शिसवे यांच्यासह पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, पोलिस उपआयुक्त नम्रता पाटील, आमदार चेतन तुपे, माजी आमदार योगेश टिळेकर, नगरसेविका रंजना टिळेकर, संगीता ठोसर, वृषाली कामठे, वर्षा साठे, नगरसेवक साईनाथ बाबर, गफूर पठाण यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी राजेंद्र गलांडे यांनी केले होते.

यावेळी पुणे शहारातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आरक्षित जागा शोधून पोलिस स्टेशन बांधले जाणार असल्याचे आयुक्त शुक्ला यांनी सांगीतले. पुण्यात नव्याने दोन पोलिस स्टेशनचे काम सुरु होत असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगीतले, या कार्यालयातून नागरिकांना चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करीत आयुक्तांनी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिकेतील छेडछाड आता गुन्हा ठरणार

SCROLL FOR NEXT