पुणे

पोलीस पाटलांना हवे नोकरीत आरक्षण

CD

पोलिस पाटलांनाही शासकीय सेवेत संधी द्या

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन; लवकरच बैठक घेण्याचे आश्वासन

ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर : कोतवालांना तलाठी भरतीत २० टक्के आरक्षण देण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर पोलिस पाटलांनाही शैक्षणिक पात्रता आणि सेवाकालीन अनुभवाच्या आधारे शासकीय सेवेत विशेष संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासंदर्भात पोलिस पाटील रूपाली लांडे आणि शालिनी गजभिये यांनी महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन दिले.
मोहपा येथे आयोजित पोलिस पाटील कार्यशाळेत हे निवेदन देण्यात आले. पोलिस पाटलांना गावपातळीवरील कायदा व सुव्यवस्था, पंचनामा, सर्वेक्षण, आपत्ती व्यवस्थापन, निवडणूक प्रक्रिया तसेच विविध प्रशासकीय कामांचा प्रत्यक्ष अनुभव असतो. त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित शासकीय पदांच्या भरतीत त्यांना प्राधान्य किंवा विशेष संधी द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
कोतवालांना तलाठी भरतीत २० टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असताना पोलिस पाटलांचाही शासनाने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी भूमिका प्रतिनिधींनी मांडली. पोलिस पाटलांच्या अनुभवाचा शासकीय यंत्रणेला उपयोग होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले.
निवेदनाची दखल घेत बावनकुळे यांनी या संदर्भात लवकरच बैठक घेऊन सकारात्मक चर्चा करण्याचे आश्वासन दिल्याचे पोलिस पाटील प्रतिनिधींनी सांगितले. या वेळी भूमिका हुमणे, स्नेहलता साठवणे, नीतिमा गजभिये, सविता गजभिये, मनिषा वैरागडे, नंदिनी फुकट, शिल्पा ढोणे, आरती गभणे, सुवर्णा सेबे, रूपाली पिकलमुंडे, शरद लांबट, गुलशन मेश्राम, प्रशांत वाडीभस्मे, युवराज गाढवे, संदीप पत्रे, मनोज चौधरी, मंगेश मोटघरे आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet News: राज्याच्या कृषि विभागात चार पदांच्या निर्मितीस मान्यता, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील ८ मोठे निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे-पाटील यांच्या स्वागताच फलक फाडला; मसुरमध्ये मराठा बांधवांचा रास्तारोको - गुन्हा दाखल करण्याची मागणी

हास्यजत्रेच्या सेटवर विराज जगतापवर संतापलेले सचिन गोस्वामी; समजावायला आलेली प्राजक्ता माळी, काय होतं कारण?

Marathi News Live Updates : शिवसेना पक्षचिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी, कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

Miraj News : नामकरणाचा श्रेयवाद पेटला! प्रशासकीय इमारतीला डॉ. आंबेडकरांचे नाव, तर सभागृहाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्याचा ठराव मंजूर; सत्ताधारी-विरोधक भिडले

SCROLL FOR NEXT