Police permission will be required to Marriage pune 
पुणे

शुभमंगलसाठी जरा ‘सावधान’

सकाळवृत्तसेवा

पुणे  : लग्नच काय कोणताही घरगुती, खासगी, सरकारी कार्यक्रमच नव्हे; तर राजकीय सभा-कार्यक्रमांवर नजर ठेवा आणि दोनशेपेक्षा अधिक जणांची गर्दी करणाऱ्यांना धडा शिकवा, असा आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पोलिसांच्या परवानगीनंतरच लग्न, कार्यक्रम घेता येईल. परंतु, त्यासाठी एका ठिकाणी दोनशे जणांना परवानगी असेल, हेही पवार यांनी स्पष्ट केले. परिणामी, पोलिस परवानगीशिवाय आता वधू-वरांना बोहल्यावर चढता येणार नाही.

मंगल कार्यालये, लॉन आणि हॉटेलमधील कार्यक्रमांतून लोकांची गर्दी होणार नाही, याची लेखी हमीही कार्यालय, हॉटेलमालकांकडून घेतली जाणार आहे. कोरोनाच्या साथीत सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांत विशेषत: लग्न समारंभांसह विविध कार्यक्रमांतील मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येत असल्याचे दिसून आले आहे. त्यातही मास्क न वापरण्यापासून सोशल डिस्टन्सकडेही पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, असे आरोग्य यंत्रणांचे निरीक्षण आहे. ही बाब गांभीर्याने घेत, उपमुख्यमंत्री पवार यांनी यासंदर्भात नव्याने बंधने घातली आहेत.

पालकमंत्री म्हणतात...
- सध्याच्या स्थितीत प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे
- मात्र, तसे होत नसल्यानेच रुग्ण वाढत आहेत
- त्यामुळे सार्वजनिक कार्यक्रम मर्यादित लोकांमध्ये व्हावेत
- त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे
- लग्नासह प्रत्येक कार्यक्रमांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागेल
- कार्यक्रमात दोनशेच लोक असतील, याची हमी आयोजकांकडून घेतली जाईल
- परवानगीसाठी एक खिडकी योजना राबविण्यात येईल

''कार्यक्रमांसाठीच्या नव्या नियमांचे आदेश सोमवारी सकाळी जाहीर होतील. त्यानंतर मध्यरात्रीपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.''
- सौरभ राव, विभागीय आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime: मुंबईत थरकाप उडवणारी घटना! रिक्षातून उतरली… तरीही पाठलाग सुरूच; अल्पवयीन तरुणीची अंगावर शहारे आणणारी आपबीती

कोकणच्या सागरी पराक्रमाचा पुरावा! वीरगळावर सापडले प्राचीन नौकायुद्धाचे जिवंत दृश्य, खारेपाटण ठरू शकते भविष्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ

अर्जुन आणि सायलीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन! सायलीनं दिलं खास सप्राईज, Tharla Tar Mag चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

Pune Weather : पुढील दोन दिवस पुण्यात उकाडा कायम; सकाळी आणि रात्री काहीसा गारवा

Viral Video : वडिलांनी घरात सगळ्यांसमोर वाचलं मुलाच्या गर्लफ्रेंडचं लव्ह लेटर,पुढं असं घडलं असं काही... व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही

SCROLL FOR NEXT