मंद्रूपमध्ये ‘पोलिस जनता चषक’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती
दक्षिण सोलापूर, ता. १२ : मंद्रूप पोलिस आणि नागरिकांमधील समन्वय व सुसंवाद अधिक दृढ व्हावा, या उद्देशाने मंद्रूप पोलिस ठाणे आणि लोकसहभागातून ‘पोलिस जनता चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाले.
या उद्घाटन समारंभास अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, पोलिस उपअधीक्षक सूरज जगताप आणि मंद्रूप पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक गणेश शिंदे-पाटील यांची विशेष उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तसेच फलंदाजी करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी औज (मं.) येथील समाजसेवक अब्दुल कादिर बडेजागीरदार, अहमद बडेजागीरदार, पोलिस उपनिरीक्षक राज डांगे, अमितकुमार करपे, अश्फाक मियावाले, बिराप्पा वाघमोडे, गणेश पाटील यांच्यासह परिसरातील विविध गावांचे पोलिस पाटील, पत्रकार, तरुण मंडळांचे पदाधिकारी आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील तरुण खेळाडूंना आपल्या क्रीडागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच पोलिस आणि नागरिकांमधील एकोपा वाढण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी मंद्रूप पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक आयोजक परिश्रम घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.