पुणे

झेंडेवाडीतील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

CD

सासवड, ता. ९ : झेंडेवाडी (ता. पुरंदर) येथील ''हॉटेल व्हिक्टोरिया इन''वर पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी दुपारी धाड टाकून जुगार अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत १८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन लाख ६४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर मालक विजय कोल्हापुरे आणि व्यवस्थापक बबन मानकर हे बेकायदेशीर जुगार अड्डा चालवत होते. दुपारी ४:४५ च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपी रंगेहाथ सापडले. पोलिसांनी रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण ३,६४,०५० रुपयांचा ऐवज जप्त केला.
या कारवाईत राहुल निळोबा फंड (रांजणगाव), विवेक माणिकराव काळभोर (लोणीकाळभोर), दत्तात्रय राजाराम फडतरे (वरूड, सातारा), रूपचंद तुकाराम साबळे (शिवधर, सातारा), अहमद शब्बीर मोगल (लोणीकाळभोर), जॉन सबस्टिल नायर (खडकी), अर्जुन पन्हालाल येरवाल (लोणीकाळभोर), सुरेश भगवान घुले (मांजरी), पुंडलिक गजानन काळभोर (लोणीकाळभोर), मंगेश कृष्णकांत डोईजोड (पिंपरी), प्रज्वल संदिप अवगुडे (हांडेवाडी), किरण रमेश बांदल (हडपसर), शिवकुमार विश्वनाथ मथपरी (वारजे), अमित शंकर घुले (मांजरी), अमित पांडुरंग राऊत (कोथरूड), राकेश बबन मोहिते (सणसवाडी), बबन जगन्नाथ मानकर, विजय बाबूराव कोल्हापुरे यांचा समावेश आहे.
पोलिस हवालदार अभिजित एकशिंगे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

Sangli ACB Trap : भूमी अभिलेखमधील दोघे लाच घेताना जाळ्यात; ईश्‍वरपुरात रचला सापळा, प्रॉपर्टी कार्डावर क्षेत्र दुरुस्तीसाठी घेतले 50 हजार

SCROLL FOR NEXT