पुणे

निर्यात फसवणूक प्रकरणातील रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश.

CD

फसवणुकीतील रक्कम परत मिळवून देण्यात पोलिसांना यश
करमाळा : येथे केळी निर्यात व्यवहारात झालेल्या फसवणूक प्रकरणात पोलिसांनी तत्पर कारवाई करत पीडिताची १ लाख ८६ हजार रुपयांची रक्कम परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. तालुक्यातील माजी नगरसेवक तथा माजी आमदार कै. नामदेवराव जगताप यांचे सुपुत्र राहुल जगताप यांची केळी निर्यात व्यवहारात नोराली हकीगत (इराण) व विनोद त्रिवेदी (रा. मुंबई) यांनी फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रशिक्षणार्थी पोलिस अधीक्षक अंजना कृष्णा यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत पोलिस निरीक्षक रणजित माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करून फसवणुकीची रक्कम आरोपींकडून परत मिळवून दिली. न्याय मिळाल्याबद्दल राहुल जगताप यांनी पोलिसांचे आभार मानले.
---
किराणा दुकानातून २ लाखांचा माल चोरीस
कुर्डुवाडी : बंद किराणा दुकानाचे लोखंडी शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे २ लाख १० हजार ४० रुपयांचा किराणा माल चोरून नेला. ही घटना शुक्रवारी (ता. १३) रात्री कुर्डुवाडी- पंढरपूर रस्त्यालगत कुर्डू हद्दीत घडली. औदुंबर गोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुर्डुवाडी पोलिसांत या घटनेची नोंद करण्यात आली आहे. फिर्यादीने शुक्रवारी रात्री आपले गोविंद एजन्सी किराणा दुकान बंद करून घरी गेले. चोरट्यांनी रात्रीतून शटर उचकटून आतील १०० किलो तीळ, १४२ किलो तांदूळ, ६० किलो मालदांडी ज्वारी, १५० किलो साखर, ९० किलो बदाम, ३५ किलो वेलची असा एकूण २ लाख १० हजार ४० रुपयांचा किराणा माल चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादीच्या भाचाने दुकानाचे शटर उघडे असल्याचे पाहिल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले.
---
PNU26B01503
पाटकूल (ता. मोहोळ) : येथे सह्याद्री महिला अर्बन क्रेडिट सोसायटीच्या उद्‌घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना सोनिया गोरे, प्रियांका पाटील, शुभांगी चवरे आदी.
---
सह्याद्री अर्बन क्रेडिट सोसायटी शाखेचे उद्‌घाटन
पाटकूल : पाटकूल (ता. मोहोळ) येथे सह्याद्री अर्बन महिला क्रेडिट को-ऑप. सोसायटीच्या शाखेचे उद्‌घाटन सोनिया जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी प्रियांका विक्रांत पाटील होत्या. यावेळी ज्योती चव्हाण, पतसंस्थेच्या अध्यक्षा शुभांगी चवरे, बालविकास प्रकल्प अधिकारी सुवर्णा जाधव, संजीवनी गुंड, रीना माने, उपसरपंच मयूरी चवरे, माजी सरपंच अंजली आढेगावकर, दीपाली चवरे, जयश्री रणदिवे, अनुजा लोखंडे, ज्येष्ठ नेते प्रकाश कस्तुरे, माजी जि.प. सदस्य भाऊसाहेब सलगर, बाजार समिती संचालक सज्जन चवरे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन पतसंस्थेमुळे परिसरातील महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत होईल, असा विश्वास अध्यक्षा चवरे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिवसेना-भाजपमध्ये नाराजी? एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; भाजपची तक्रार करत अमित शहांना मनातील खदखद सांगणार!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

Indian Army Agniveer Bharti : भारतीय लष्करात अग्निवीरांसाठी मेगा भरती; ऑनलाईन प्रक्रिया सुरु, घरबसल्या कसा अर्ज करायचा? पाहा

Latest Marathi Update: निमंत्रणावरून उपमहापौर- महापौरांमध्ये नाराजीनाट्य

कोण आहे झी मराठीच्या 'सनई चौघडे' मालिकेत दिसणारी नायिका? ५ वर्षानंतर केलंय पुनरागमन, म्हणते-

SCROLL FOR NEXT