police recruitment youth Accident container driver who escaped after accident was arrested esakal
पुणे

Accident News : अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाला अटक

शिवाजीनगर पोलिसांकडून अपघाताचा गुन्हा उघड

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पोलिस भरतीसाठी पुण्यात आलेल्या एका महिला उमेदवाराच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. या अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनरचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी शिताफीने अटक केली.

अंकुश राजेंद्र राख (रा. हाजीपुर पो. ब्रम्हागांव ता. आष्टी, जि. बीड) असे अटक केलेल्या कंटेनरचालकाचे नाव आहे. तर, या अपघातात सुरेश सखाराम गवळी (वय ५३, रा. रमाबाई आंबेडकरनगर, नाशिक) यांचा मृत्यू झाला होता.

गवळी हे व्यवसायाने रिक्षाचालक होते. ते मुलीच्या पोलिस भरती प्रक्रियेसाठी पुण्यात आले होते. १३ मार्च रोजी पहाटे ते शिवाजीनगर येथील एचपी पेट्रोल पंपासमोर रस्ता ओलांडत होते. त्यावेळी कंटेनरने धडक दिल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर कंटेनरचालक पसार झाला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.हा वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही तपासले.

त्यामध्ये हा कंटेनर बाबा रोडवेज जालना येथील (क्रमांक एमएच- २१ बीएच-३३६९) असल्याचे आढळून आले. हा चालक जालना येथून १६ मार्च रोजी वाघोली येथे येणार असल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार सहायक निरीक्षक भोलेनाथ अहिवळे, पोलिस हवालदार रणजित फडतरे, अतुल साठे यांनी वाघोली वजन काट्याजवळ सापळा रचून कंटेनरचालकाला ताब्यात घेतले. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल आणि सहायक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT