police refuse to file case of theft bharati vidyapeeth police station Sakal
पुणे

Pune Crime News : चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ; भारती विद्यापीठ ठाण्यातील प्रकार

दुकान बंद करून घरी निघालेल्या चहा विक्रेत्याचे पाच हजार रुपये चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास भारती विद्यापीठ पोलिस टाळाटाळ करीत असल्याचा प्रकार घडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : दुकान बंद करून घरी निघालेल्या चहा विक्रेत्याचे पाच हजार रुपये चोरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यास भारती विद्यापीठ पोलिस टाळाटाळ करीत असल्याचा प्रकार घडला आहे. गुन्हा दाखल करून घेण्यासाठी चहा विक्रेते चार ते पाच वेळा पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना विविध कारणे सांगत नंतर या असा कळविले जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बाळू सोपान कटके (वय ६३, रा. गुजरवाडी, रासकर पार्क) यांचे मॉडेल कॉलनीमधील दीप बंगला चौकाजवळ चहाचा स्टॉल आहे. पाच एप्रिलला रात्री नऊ वाजता ते दुकान बंद करून घरी जात होते.

ते दुचाकीवरून गुजरवाडी फाटा पोचले असता दुचाकीवरून आलेल्या तिघांना त्यांच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला. त्यानंतर पुढे काही अंतरावर तिघांची त्यांची दुचाकी आडवी करून कटके यांना थांबवले.

‘कशीही गाडी चालवता’ असे म्हणून एका आरोपीने त्यांचा पाय धरला. त्यानंतर धकामावत कपटे यांच्या खिशातून पाच हजार रुपये काढून घेतले व तिघे फरार झाले. हा प्रकार घडल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करण्यासाठी कात्रज चौकीत गेलो.

मात्र वरिष्ठ अधिकारी नसल्याने गुन्हा दाखल करता येणार नाही, असे सांगत मला दुसऱ्या दिवशी बोलविण्यात आले. त्यानुसार मी पुन्हा सात एप्रिलला चौकीत गेले. मात्र तक्रार दाखल करून घेण्यात आले नाही.

त्यानंतर मला भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात जाण्यास सांगितले. तेथे गेल्यानंतर देखील माझी कोणी दखल घेतली नाही, असे कटके यांनी सांगितले. गुन्हा घडून आठ दिवस उलटले तरी अद्याप तक्रार दाखल न झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गुन्हा दाखल का करण्यात आला नाही याची चौकशी करून याबाबत त्वरित गुन्हा दाखल करून घेतला जात आहे. दशरथ पाटील, पोलिस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलिस ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT