Pune  sakal
पुणे

Pune : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गोमांसचे कंटेनर केले पोलिसांनी जप्त

पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादहून मुंबईला कंटेनरमधून २९ हजार गोमांस घेऊन जात असताना हा कंटेनर दौंड तालुक्यातील खडकी येथे एका ढाब्याच्या परिसरात ताब्यात घेण्यात आला.

सावता नवले

कुरकुंभ : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबादहून मुंबईला कंटेनरमधून २९ हजार गोमांस घेऊन जात असताना हा कंटेनर दौंड तालुक्यातील खडकी येथे एका ढाब्याच्या परिसरात ताब्यात घेण्यात आला. या गोमांसची बाजारातील किंमत ४७ लाख २० हजार रुपये असून १२ लाख रुपये किमतीचा कंटेनर असा एकूण ५९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. ही कारवाई रविवारी ( ता.१९ ) रात्री करण्यात आली आहे.

हैदराबाद येथून गाई व म्हशीचे गोमास घेऊन एक कंटेनर पुणे सोलापूर मार्गाने मुंबईकडे निघाल्याची माहिती गोरक्षक अक्षय राजेंद्र कांचन (रा. महादेव नगर उरुळी कांचन, ता. हवेली ) यांना मिळाली होती. हा गोमासचा कंटेनर भिगवणच्या (ता. इंदापूर ) पुढे निघाल्याची माहिती कांचन यांना मिळाल्यानंतर त्यांनी या संदर्भात दौंड पोलिसांशी संपर्क साधला. माहिती अनुसार पोलीस गोरक्षकासह खडकी येथील आकांक्षा ढाब्याच्या परिसरात सदरचा कंटेनर उभा असल्याचे निदर्शनास आले. कंटेनर चालकाकडे पोलिसांनी चौकशी केली असता त्याने कंटेनरमध्ये गोमास असल्याची कबुली दिली.

ताब्यात घेतलेल्या १८ टायर कंटेनरची वहन क्षमता २८.८० पण असताना त्यामध्ये २९ टना पेक्षा जास्त गोमास वाहतूक करताना पोलिसांना आढळून आले. यामध्ये २५ हजार किलो गायी व इतर प्राण्यांचे गोमास तर ४ हजार किलो म्हशीचे गोमास आढळून आले. याची अनुक्रमे बाजारात किंमत १६० व १८० रुपये प्रति किलो आहे. या गोमासशी बाजारातील किंमत ४७ लाख २० हजार आहे. तर ताब्यात घेतलेल्या कंटेनरची किंमत १२ लाख आहे. गोमांस व टेम्पो असा एकूण ५९ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

या प्रकरणी अक्षय कांचन यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कंटेनर चालक चंद्रकांत दत्तू साळुंखे (सध्या रा. खांदा कॉलनी, ता. पनवेल, जि. रायगड.) मूळ राहणार जळवा ता. सांगोला, जि. सोलापूर ) येथील आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३२५, महाराष्ट्र पाणी संरक्षण अधिनियम १९६० च्या कलम ५, ५ए, ५बी, ५सी,९,११ व प्राणी परिवहन अधिनियम ४७,४८,४९,५४,५६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष डोके सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड आदी पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT