पुणे

पुणे जिल्ह्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अल्पवयीन मुलींची सुटका

अमर परदेशी

पाटस : पाटस (ता. दौंड) येथे महामार्गावरील टोलनाक्याच्या हद्दीत पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. यावेळी एका अल्पवयीन मुलीकडून वेशा व्यवसाय करवून घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

या प्रकरणी पोलिसांनी वेशा व्यवसाय करवून घेणाऱयाच्या चांगल्याच मुसक्या आवळल्या प्रविण रामदास शिंदे (वय २७) रा. येळपणे (ता. श्रीगोंदा, जि. नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाटस टोलनाक्याच्या हद्दीत एक जण सेक्स रॅकेट चालवित असून, यामध्ये अल्पवयीन मुली व काही महिलांचा समावेश आहे. याची गोपनीय माहिती पुणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी कारवाईचे आदेश दिले. पोलिस पथकाने बुधवारी (ता. ७) सायकांळी पाच वाजता या ठिकाणी अचानक छापा टाकला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी आरोपी शिंदे हा एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीकडून अनैतिक शारीरीक व्यापार करवून घेताना आढळून आला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तसेच ३९ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी शिंदे विरुद्ध स्त्रीया-मुली अनैतिक व्यापार प्रतिंबधक कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात इतरही काही महिलांचा समावेश असल्याचे बोलले जात. मात्र, यावेळी त्या आढळून आल्या नाहीत. शिंदे हा फास्टटॅग विक्रीचाही व्यवसाय करीत असल्याचे चर्चा आहे. शिवाय तो फोन वरुनही सेक्स रॅकेट चालवित होता. पोलिस अधिक्षक डाॅ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहीते, पोलिस निरीक्षक पदमाकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक पुथ्वीराज ताटे, सहायक फौजदार सागर चव्हाण, पोलिस हवालदार निलेश कदम, महेश गायकवाड, मुकुंद आयाचीत, उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, लता जगताप आदी पोलिस पथकाने ही कारवाई केली. पाटस परीसरात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT