vehical
vehical 
पुणे

कधी सुधारणार पुणेकर?; विश्रांतवाडीत तब्बल एवढी वाहने पोलिसांनी केली जप्त

सकाळवृत्तसेवा

येरवडा : विश्रांतवाडी पोलिसांनी मुुकुंदराव आंबेडकर चौकात तब्बल बाराशे पेक्षा अधिक दुचाकी धारकांवर कारवाई करून दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत. लॉकडाउनच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. संबंधितांना त्यांची वाहने लॉकडाउन संपल्यानंतरच मिळणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण आव्हाड यांनी दिली. 

विश्रांतवाडीमधील मुकुंदराव आंबेडकर चौक हा सर्वात मोठा चौक आहे. त्यामुळे या चौकातून विनाकारण जाणाऱ्या वाहनांवर पोलिसांचे कटाक्षाने लक्ष होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाउनच्या पहिल्या दिवसापासून विनाकारण फिरणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून दुचाकी ताब्यात घेतल्या. अनेक राजकीय मंडळींनी दूरध्वनीवरून वाहने सोडण्या संदर्भात विनंती केली. मात्र, त्यांनाच विनंती करून ही सर्व वाहने लॉकडाउन नंतरच सोडली जातील असे सांगितले.

आतापर्यंतच्या कारवाईत बाराशे पेक्षा अधिक दुचाकी व पन्नास मोटारी ताब्यात घेऊन संबंधितांना नियमाचे उल्लंघन केल्याबाबत नोटिस पाठविल्याचे आव्हाड यांनी सांगितले. 

पोलिसांनी बाराशेपेक्षा अधिक दुचाकी ताब्यात घेतल्यामुळे परिसरात सध्यातरी आपोआपच शिस्त आली आहे. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचारी वगळता कोणीच दुचाकी किंवा मोटारींचा वापर करताना दिसत नाही. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Threats to Hindu leaders: पाकमधले सिमकार्ड मराठवाड्यातल्या मोबाईलमध्ये! काय आहे हिंदू नेत्यांच्या धमकीचे नांदेड कनेक्शन

BCCI अन् टीम इंडिया टेन्शनमध्ये! टी-20 वर्ल्ड कपपूर्वी सलामीची जोडी IPL मध्ये ठरली अपयशी

राष्ट्रपती आणि पंतप्रधानांच्या VVIP ड्युटीवर बोगस डॉक्टर, अयोध्या दौऱ्यात भयंकर सुरक्षा त्रुटी

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update: स्वाती मालिवाल मारहाण प्रकरणी केजरीवालांच्या माजी 'पीए'ला समन्स

SCROLL FOR NEXT