पुणे

ज्यादा दराने किराणा मालाची विक्री करताय?; मग हे वाचाच!

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन : किराणा मालाची चढ्या दराने विक्री करून अधिक नफा मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका किराणा दुकानदारावर लोणी काळभोर पोलिसांनी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ व साथीचे रोगप्रतिबंध कायदा या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. 

संतोष कोचेटा (रा. उरुळी कांचन, ता.हवेली, जि.पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या किराणा दुकानदाराचे नाव असून, याप्रकरणी उरुळी कांचनचे गावकामगार तलाठी प्रदिप जवळकर यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.

दरम्यान, आपत्ती काळात चढ्या दराने किराणा माल विक्री 
करण्याच्या दुकानदारावर गुन्हा दाखल होण्याची जिल्ह्यात ही पहिलीच घटना ठरली आहे. 

लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , कोरोना विषाणू संसंर्गाचा पार्श्वभूमीवर साथीचे रोग कालाधीत जीवनावश्यक वस्तू सेवा रास्त भावात विक्री करावी, असे आदेश शासनाने दिले आहेत. मात्र, संतोष कोठे हे ग्राहकांकडून अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने १ किलो तुरडाळीचा भाव ९७ रुपये विक्री असताना या डाळीची विक्री ११० रुपये दराने तर १ किलो शेंगदाणा तेल ११० रुपये दराने विक्री करणे बंधनकारक असताना १५० रुपये किलो दराने विक्री करत होते. काही ग्राहकानीच वरील प्रकार उघडकीस आणला.

दरम्यान, किराणा मालाचा दुकानदार नफा मिळविण्याचा दृष्टीने ग्राहकाकडून अधिक पैसे उकळीत असल्याचा प्रकार ग्राहकांनी उघडकीस आणून देखील संबंधित मालकावर गुन्हा दाखल करण्याचा अधिकारातून तलाठी स्तरावर अनभिज्ञता होती.

कारवाईचा अधिकारी कोणाला म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी व पत्रकारांना वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत दाद माघण्याची वेळ आली. अखेर वरिष्ठ स्तरावरुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश आल्यानंतर मालकावर गुन्हा दाखल झाला. या प्रकरणात महसूल विभागाचे तालुक्यावर नियंत्रण नसल्याचे त्रिवार सत्य उजेडात आले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदेशीररीत्या हे दुकान सिल बंद करणार का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : ३ जानेवारी २०२६ ते ९ जानेवारी २०२६ - मराठी राशी भविष्य

MPSC Protest: 5 वर्षांपासून पुण्यात राहून PSI होण्याचं स्वप्न... बाप शेतमजुरी करून पैसे पाठवतो, पण आयोग? विद्यार्थ्यांनी काय सांगितलं?

Savitribai Phule Jayanti: संघर्षातून घडलेली क्रांती! सावित्रीबाई फुलेंचे 10 विचार बदलतील तुमचं विचारविश्व

Gemini Horoscope : यशासाठी झगडल्याशिवाय पर्याय नाही, नोकरीच्या ठिकाणी मोठी जबाबदारी मिळेल, पण..; मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी कसं असेल नवीन वर्ष?

Uddhav Thackeray : दोन गुजरात्यांच्या हाती मुंबई द्यायची नाही

SCROLL FOR NEXT