पुणे

पुणे : लॉकडाऊन आहे, घराबाहेर पडू नका; 16 जणांना केलं गेलंय हद्दपार

दत्ता भोंगळे

गराडे : पुरंदर तालुक्यातील सासवड पोलिसांनी लॉकडाऊन काळात नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आत्तापर्यंत १३ लाख ५० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर ३८९ लोकांवर १८८ नुसार कारवाई केली, अशी माहिती सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके यांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने सासवड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक डी. एस. हाके व सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड पोलिस स्टेशनचे वाहतूक विभागाचे पोलिस नाईक ज्योतिबा भोसले व पथकाने १५ मार्च ते १३ जुलै या लॉकडाऊनच्या काळात सासवड पोलिस स्टेशनकडून ५६६६ वाहनांवर कारवाई कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून आत्तापर्यंत १३ लाख ५० हजार १०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लॉकडाऊनचे उल्लंघन करून विनाकारण फिरणारे, विनामास्क फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात भादंवि कलम १८८ अन्वये ३८९ गुन्हे दाखल केले आहे. तसेच दारूबंदी संदर्भात ३५ गुन्हे व झुगारप्रकरणी २ गुन्हे दाखल केले आहेत. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४४ प्रमाणे अद्यापपर्यंत १६ जणांना हद्दपार करण्यात आलेले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदरची कामगिरी सासवड पोलिस स्टेशनचे स.पो. फौ. रविंद्र काळभोर, पो. हवा. माने, एस. आर. चिखले, बाळासाहेब गोडसे, कोकरे, पो.ना. अजित माने, एम. एम.खरात, कोल्हे, पो. शिपाई कैलास सरक, प्रतीक धिवार, निलेश जाधव, दत्ता जाधव, होमगार्ड, ग्रामरक्षक दलाची सदस्य यांनी केली आहे.

(Edited By : Krupadan Awale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divorce Petition :‘काळा रंग, जाडजूड शरीरयष्टी’वरून पत्नी टोमणे मारते; पतीने मागितला घटस्फोट, हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

लग्नाला १२ वर्ष होतील तरीही मला कळलेलं नाही की... श्रेया बुगडेने सांगितलं नवरा निखिल सेठसोबत कसं आहे नातं

IND vs WI 1st ODI: ऋतुराज गायकवाड IN, यशस्वी जैस्वाल बाकावरच! नबीचे पदार्पण; पहिल्या वन डेसाठी तगडी Playing XI

Maharashtra Ganesh Visarjan Live: कसबा गणपतीच्या मिरवणुकीला उत्साहात सुरुवात, बाप्पाचे देखणे रूप पाहण्यासाठी आणि निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

Crime News : तुझे बाळ दे, एक लाख रुपये देते; दलाल माय-लेकीने विकत घेतला नवजात शिशू, चौघांना अटक

SCROLL FOR NEXT