Lawyers Sakal
पुणे

मुलाला उपचारासाठी घेऊन जाणाऱ्या वकिलांना दंड भरूनही पोलिसांनी धमकावले

आपल्या गंभीर भाजलेल्या लहान मुलाला उपचारासाठी मोटारीतून दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या वकिलांना दंड भरूनही पोलिसांनी धमकावले.

सोमनाथ भिले

डोर्लेवाडी - आपल्या गंभीर भाजलेल्या लहान मुलाला उपचारासाठी मोटारीतून दवाखान्यात घेऊन जाणाऱ्या डोर्लेवाडी (ता. बारामती) येथील ॲड. अतुल पोपट भोपळे यांना बारामती शहर पोलिस वाहतूक कर्मचाऱ्यांनी अर्वाच्य भाषेत धमकावल्याची तक्रार ॲड. अतुल भोपळे यांनी पोलिस अधिक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी यांचेकडे केली आहे. बारामती वकिल संघटनेच्या सदस्यांनी शहर पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली. शिवाय धमकावणारे पोलिसावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी त्यांनी केली.

ऍड. अतुल भोपळे यांनी बारामती शहर पोलिस ठाण्याला दिलेल्या तक्रारी अर्जानुसार, त्यांच्या लहान मुलाला ६० टक्के भाजल्याने त्याला कुटुंबासह मोटारीतून उपचारासाठी आज (ता. २९) सकाळी साडे अकराच्या सुमारास ते खासगी दवाखान्यात घेवून चालले होते. शहरातील भिगवण चौकात आले असताना महिला पोलिसांनी त्यांचे वाहन थांबवले. त्यावेळी उपस्थित दोन पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांना त्यांनी मुलाची परिस्थिती सांगत जावू देण्याची विनंती केली. परंतु मास्क न घातल्याच्या कारणावरून एका कर्मचाऱ्यांनी त्यांना दंडाची पावती फाडायला लावली. नियमानुसार पावती फाडल्यानंतर ॲड. भोपळे यांनी अनेक नागरिक विनामास्क जात आहेत, माझ्यावरच कारवाई का करता? अशी विचारणा केली. त्यावर एका कर्मचाऱ्यांने त्यांचे गचुरे पकडत त्यांना पोलिसांच्या वाहनात नेवून बसवले. अर्वाच्य शिविगाळ केली. तुला जेलमध्ये बसवतो मग कायदा कळेल अशी भाषा वापरली.

यावेळी चौकातील उपस्थित काही नागरिकांनी लहान मुलाची परिस्थिती पाहून उपचारासाठी भोपळे यांना जावू द्यावे, अशी विनंती केल्यावर भोपळे यांना पोलिसांच्या गाडीतून खाली उतरवण्यात आले. दंडाची पावती फाडल्यानंतरही पोलिसांच्या या वागण्यामुळे मुलाला दवाखान्यात घेवून जाण्यास उशीर झाला असून त्यामुळे जिविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आज घडलेली घटना अत्यंत निंदनीय व चुकीची आहे. वकिल हा देखील कायद्याचा एक भाग आहे. त्यांच्या मुलाला गंभीररित्या भाजले असताना पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य न ओळखता त्यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. आम्ही घटनेची तक्रार देण्यासाठी आलो असताना आम्हालाही एक तास ताटकळत ठेवले आहे. पोलिसांच्या या कृतीचा आम्ही निषेध करतो, दोषींवर कारवाई व्हावी.

- ॲड. चंद्रकांत सोकटे, अध्यक्ष बारामती वकिल संघटना

विनामास्क नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई सुरु असताना हा प्रकार घडला आहे. ॲड भोपळे हे मुलाला घेवून दवाखान्यात निघाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. वकिल वर्गाने यासंबंधी माझी भेट घेतली. त्यांचा तक्रारी अर्जही प्राप्त झाला असून त्या अनुषंगाने चौकशी केली जाईल.

- गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT