पुणे

लॉकडाऊन असताना दारू विक्री सुरु; पोलिसांनी...

सकाळवृत्तसेवा

वाघोली : एकीकडे जग कोरोनाच्या विळख्यात व देशात लॉकडाऊन असतानाही अवैध देशीदारू विक्रेत्यांचा मात्र काळा धंदा सुरुच आहे. लोणीकंद पोलिसानी 8 अवैध दारू भट्ट्या उखडून टाकल्या. तसेच दोन ठिकाणी अवैध दारू विक्री रोखली. सुमारे लाखभर रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.

पिंपरी सांडस, शिरसवडी, वाडेबोलाई, वाघोली आव्हाळवाडी रोड, वाघोली गायरान, वाघोली परिसर, कोलवडी गावातील शितोळेवस्ती येथे धाडी टाकण्यात आल्या. अवैध दारू विक्रेते आड बाजूला ही दारू विकण्याचे काम करीत आहेत. दारू पिणाऱ्यांना या जागा समजत असल्याने ते बरोबर तेथे पोहचतात. मात्र, नागरिकही जागरूक असल्याने तेही पोलिसांकडे तक्रार करतात. याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस उपअधीक्षक सई भोरे पाटील, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक धनंजय ढोणे,  पोलिस कर्मचारी बाळासाहेब सकाटे, ऋषिकेश व्यवहारे, समीर पिलाने यांनी ही कारवाई केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drought in Maharashtra : दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Asian Games Cricket : नेपाळचा ऐतिहासिक विजय, अफगाणिस्तानला नमवले; ब गटात हाँगकाँगचा विजय, भारताला कोण भिडणार?

२४ किलो वजन घटवलं! वनिता खरातने सांगितलं डाएटचं सीक्रेट; म्हणाली, ‘आज माझा चीट डे’

Maharashtra Ganesh Visarjan Live: गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी भक्तांसाठी अनोखी सेवा; भिवंडीत तब्बल एक लाख वडापावचे मोफत वाटप

Beed Ganesh Visarjan: मिरवणुकीत नाचा ; पण डीजे अजिबात चालणार नाही;प्रशासनाचा इशारा ; चार विहिरींवर विसर्जनाची सोय, मार्गावर हायमास्टचा झगमगाट

SCROLL FOR NEXT