पुणे

पुणे-मुंबईवरून विनापरवाना आले 250 जण; मग पोलिसांनी...

डी. के. वळसे-पाटील

मंचर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंचर पोलिसांनी आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ येथे पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. मंगळवारी (ता. 12) दुपारी एक वाजेपर्यत पुणे-मुंबईवरून विनापरवाना आलेल्या 70 चारचाकी व 20 दुचाकी वाहने व वाहनातील एकूण 250 जणांना परत माघारी पाठवण्यात आले आहे. त्यांना आंबेगाव तालुक्यातील प्रवेशापासून रोखण्यात आले. ही कारवाई अधिक तीव्र केली जाईल, असा इशारा पोलिस खात्याने दिला आहे.

गेल्या तीन ते चार दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्याचा फायदा नागरिक उठवत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. विशेषतः विनापरवाना पुणे व मुंबईवरून आलेल्या वाहनांची कसून तपासणी पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे, पोलिस उपनिरीक्षक सागर खबाले, गुप्तवार्ता पोलिस विभागाचे विनोद गायकवाड, मंगेश लोखंडे, अंकुश मिसाळ, रमेश करंडे आदी पोलिस कर्मचारी करत होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनापरवाना आलेले म्हणजेच वैद्यकीय तपासणी न करता शहरातील लोक गावी परतत आहेत. त्यांच्यामुळे गावात राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेठ, कळंब, तळेघर, भीमाशंकर, गिरवली, कारफाटा, रोडेवाडी फाटा, लोणी, शिरदाळे, गावडेवाडी आदी आंबेगाव तालुक्याच्या सीमेवर 24 तास बंदोबस्त ठेऊन वाहनांची व येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी केली जाईल.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विनापरवाना येणाऱ्यांना आंबेगाव तालुक्यात प्रवेश दिला जाणार नाही. पुणे-मुंबईच्या नागरिकांनी सद्यस्थितीत गावी येण्याचे टाळावे. महाभयंकर संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी पोलिस खात्याला सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT