The police will get good news soon about Weekly vacation and less duty 
पुणे

पोलिसांना लवकरच मिळणार खुषखबर! साप्ताहिक सुट्टी अन्‌ ड्युटीही कमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनामुळे रखडलेली पोलिस भरती नव्या वर्षात मार्गी लागण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. राज्याला तब्बल साडे बारा हजार पोलिसांचे अतिरिक्त बळ नव्या भरतीद्वारे मिळणार आहे. अपुऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांवर येणारा ड्युटीचा ताण कमी होऊन, 10-12 तास करावी लागणारी ड्यूटी आठ तासांवर येणार आहे. त्याचबरोबर आठवड्यातून एकदा हक्काची सुट्टी मिळणार आहे. 

गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी मंगळवारी ही माहिती दिली. विविध कार्यक्रमासाठी पुण्यात आले असताना देसाई यांनी 'सकाळ' कार्यालयास भेट देऊन संवाद साधला. भरतीची प्रक्रिया अगोदर झाली होती. मात्र कोरोनामुळे आरोग्य विभाग वगळता सर्व विभागातील भरती थांबविण्यात आली होती. मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर देसाई यांना विचारले असता, ते म्हणाले, ""पुढील वर्षभरात भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल'. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

देसाई म्हणाले, "आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर ही भरती प्रक्रिया थांबली होती. मात्र हा तिढा लवकरच संपेल. नव्या वर्षाच्या सुरवातीलाच लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुढील वर्षभरात पूर्ण करून, पोलिस दलात नव्याने साडे बारा हजार पोलिस दाखल होतील. सध्या राज्यातील सगळ्याच पोलिस दलामध्ये अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांना 10 ते 12 तास काम करावे लागते. विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी चांगले काम केले आहे. नव्या भरती प्रक्रियेमुळे जादा पोलिस उपलब्ध होऊन उपलब्ध पोलिसांना आठ तासच ड्यूटी करायला मिळू शकते. तसेच पोलिसांच्या घरांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी 450 कोटी रुपये मंजूर करून दिले आहेत.'' 

पोलिस दलास बंदोबस्त व गस्त करण्यासाठी उपयोगी पडेल, यादृष्टीने अद्ययावत दर्जाच्या 362 गाड्या मागील वर्षी दिल्या आहेत. त्याचबरोबर आणखी साडे तीनशे गाड्या त्यांना देण्यात येणार आहेत. याबरोबरच महिला पोलिसांच्या निर्भया पथकासाठी देखील दोन अद्ययावत वाहने सामाजिक उत्तरदायित्वनिधी (सीएसआर फंड) उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असेही शंभुराजे देसाई यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

DGCA Action on Air India : 'एअर इंडिया'ला मोठा झटका!, 'डीजीसीए'ने ठोठावला १ कोटी रुपयांचा दंड

‘एक्साईज’ची मोठी कारवाई! बनावट विदेशी दारू विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! म्होरक्या बीड जिल्ह्यातील ‘या’ गावचा; लातूर, सोलापूरचेही कनेक्शन, वाचा...

SCROLL FOR NEXT