corona 
पुणे

सावधान, कोरोना तपासणी टाळणाऱ्यांना पोलिसच घेऊन जाणार 

श्रद्धा जोशी

गुळुंचे (पुणे) : कोरोना स्वॅब तपासणीसाठी हाय रिस्क व लो रिस्क संपर्कातील काही लोक आरोग्य सेवकांना नकार देत आहेत. त्यातून कोरोना विषाणूचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेले जे लोक कोरोना तपासणीसाठी नकार देत असतील, त्यांच्या दारात आता पोलिसांची गाडी येईल व त्यांना कोरोना तपासणीसाठी घेऊन जाईल, अशी स्पष्ट भूमिका पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांनी घेतली. त्यामुळे कोरोना तपासणीसाठी नकार देणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
 
गुळुंचे (ता. पुरंदर) येथे गेल्या काही दिवसात आठ जणांच्या अँटिजेन टेस्ट पाझिटिव्ह आल्या आहेत, तर एकाचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमणाची वाढती साखळी तोडण्यासाठी रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वतः होऊन तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. तसेच, स्वतः विलग राहणे आवश्यक आहे. मात्र, तरीही काहीजण नियमांचे पालन करत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे तहसीलदार सरनोबत यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. येथील आढावा बैठकीत त्यांनी विविध सूचना केल्या. कंटेनमेंट झोन तयार करून तेथे तातडीच्या सेवा सुरू ठेवाव्यात, व्यापाऱ्यांनी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवावी व सार्वजनिक ठिकाणे मोकळी ठेवावीत, असे आवाहन तहसीलदार सरनोबत यांनी केले. 

या वेळी सरपंच संभाजी कुंभार, सदस्य संतोष निगडे, ग्रामसेवक जयेंद्र सुळ, पोलिस पाटील दीपक जाधव, आरोग्य सेविका अनिता नेवसे, अक्षय निगडे, आशा स्वयंसेविका मीना निगडे आदी उपस्थित होते. दरम्यान, तलाठी महाजन हे कोरोना काळात उपस्थित राहत नसल्याने त्यांची तक्रार करण्यात आली. यावर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन सरनोबत यांनी दिले. ग्रामसेवकांनी मुख्यालयी राहण्याबाबत अक्षय निगडे यांनी मागणी केली. परंतु, तशी अट नसल्याचे तहसीलदारांनी सांगितले.

दरम्यान, आरोग्य सेवक बापूराव भंडलकर यांची बदली झाली असून, त्यांना होळ (ता. बारामती) येथे नियुक्ती देण्यात आली आहे. कोरोना काळात बापू यांनी चांगले काम केले. सध्या गावात आरोग्य सेवकांचे पद रिक्त आहे. त्यामुळे कामाचा भार आशा स्वयंसेविकांवर पडत असल्याने बापूंना पुन्हा गुळुंचे येथे नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT