crime esakal
पुणे

गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातुन पोलिसाला जबर मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कारसमोर उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातुन चार ते पाच जणांनी पोलिस कर्मचाऱ्यास जबर मारहाण करत डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक घातला.

सकाळ वृत्तसेवा

कारसमोर उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातुन चार ते पाच जणांनी पोलिस कर्मचाऱ्यास जबर मारहाण करत डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक घातला.

पुणे - कारसमोर उभी केलेली दुचाकी बाजूला घेण्यास सांगितल्याच्या रागातुन चार ते पाच जणांनी पोलिस कर्मचाऱ्यास जबर मारहाण करत डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक घातला. दरम्यान, या घटनेमध्ये पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चार ते पाच जणांविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना रविवारी (ता.18) सकाळी सव्वा दहा वाजता लोहगाव येथील पेट्रोलपंपाजवळ घडली.

कालिदास खांदवे, माऊली खांदवे, तुकाराम खांदवे (रा. लोहगाव) यांच्यासह इतर तिघांविरूद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी. आर. मोटे असे गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस कर्मचारी मोटे हे विमानतळ पोलिस ठाण्यात नेमणूकीला आहेत. ते रविवारी सकाळी सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास धानोरी जकात नाका परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची कार तेथील पेट्रोलपंपाजवळ लावली होती. दरम्यान, त्यांच्या कारसमोर एकाने दुचाकी लावली.

मोटे यांनी संबंधित दुचाकीस्वार कालिदास खांदवे यास त्याची दुचाकी कारसमोरुन बाजुला घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे खांदवे याने त्याच्या साथीदारांना बोलावून मोटे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने जबर मारहाण केली. तसेच त्यांच्या डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक घातला. या घटनेमध्ये मोटे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एन. लहाने करीत आहेत.

राजकीय दबाव टाकत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल होऊ नये, यासाठी पोलिसांवरच राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र प्रकरण गंभीर असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र थेट पोलिसालाच जीवे मारण्याचा प्रयत्न होऊनही या प्रकरणातील संशयित आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याची सद्यस्थिती आहे. दरम्यान, या प्रकरणावर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे लक्ष ठेवले असून लवकरच पुढील कारवाई होण्याची शक्‍यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganesh Chaturthi 2026 Wishes in Marathi: "गजानना श्री गणराया..." गणेश चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा गणेशभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

टीम इंडियाने नक्वींकडून आशिया कपची ट्रॉफी का घेतली नाही? BCCIने सांगितलं कारण

Ganesh Chaturthi 2026: गणेशभक्तांनो, मुहूर्ताची वेळ लक्षात ठेवा! पहाटे ४.५० ते दुपारी १.५१ पर्यंत गणरायाची प्रतिष्ठापना

Bombay High Court: ‘स्मोकिंग तंबाखू’ खाद्यपदार्थ नाही; एफएसएस कायद्यानुसार कारवाई करता येणार नाही, नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय

Marathi News Live Updates : कसबा गणपती मंदिरासमोर ढोल-ताशांचा गजर; ‘भेसळ रोखा’चे फ्लेक्स लक्षवेधी

SCROLL FOR NEXT