police file pic 
पुणे

पोलिस पाच वर्षे रजेवर गेला, गमवावी लागली नोकरी

सकाळवृत्तसेवा

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) कारवाईनंतर पाच वर्ष रजेवर जात बेशिस्त वर्तन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यास पोलिस सेवेतुन बडतर्फ करण्यात आले. पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांनी याबाबतचा आदेश दिला. 

देवदत्त भागवत मोरे असे बडतर्फ केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. मोरे हा भोसरी पोलिस ठाण्यामध्ये कार्यरत होता. त्यावेळी त्याने वाशी येथील एका नामांकीत बांधकाम व्यावसायिकाकडे लाच मागितली होती. त्यानंतर तो लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यामध्ये अडकला होता. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. दरम्यान, संबंधीत प्रकरण विभागीय चौकशी समितीपुढे गेले होते. विभागीय चौकशी अधिकाऱ्यांनी दोषारोप त्याने मान्य केले होते. त्यानंतर त्यास सेवेतुन बडतर्फ करण्यात आले. त्याबाबतचा आदेश त्यास देण्यात आला. 

‘संबंधित पोलिस कर्मचाऱ्यावर लाचलुचपतची कारवाई झाली. त्यानंतर त्याचे निलंबन करण्यात आले. दरम्यान, पाच वर्षे गैरहजर राहात होता. त्याने बेकायदेशीर व बेशिस्त वर्तन केल्यामुळे त्यास बडतर्फ केले आहे,’ असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

SCROLL FOR NEXT