work-from-home 
पुणे

पुढील सहा महिने घरूनच काम; पुण्यातील आयटी कंपन्यांचे धोरण

मंगेश कोळपकर - सकाळ वृत्तसेवा

पुणे- कोरोनामुळे आयटीतील बहुसंख्य कर्मचाऱ्यांचे अजूनही वर्क फ्रॉम होमच सुरू आहे. यामुळे कामावर आणि उत्पादकतेवर फारसा परिणाम होत नसल्याचे निरीक्षणही कंपन्यांनी नोंदविले. पुढील किमान तीन ते सहा महिने असेच काम होणार असल्याने काही कंपन्यांनी त्यांच्या भाडेतत्त्वावरील जागा परत करून खर्च कमी केला आहे.

शहर आणि परिसरातील आयटी कंपन्यांतील सुमारे ७० टक्के कर्मचारी सध्या घरातून काम करीत आहेत. तसेच केंद्र व राज्य सरकारनेही आयटी कंपन्यांना ३३ टक्के कर्मचाऱ्यांना कामावर येण्याची परवानगी दिली आहे. परिणामी अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना पुढील तीन ते सहा महिने वर्क फ्रॉम होम करण्याची तयारी ठेवण्यास सांगितले आहे. याबाबत एका बहुराष्ट्रीय कंपनीतील आयटी अधिकारी दिनेश सुभेदार म्हणाले, ‘‘अजून किमान दोन महिने याच पद्धतीने कामकाज होणार आहे.’’ तर मोबी ॲण्ड डिजिटल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष अजित गोखले म्हणाले, ‘‘वर्क फ्रॉम होममुळे उत्पादकतेत फरक पडलेला नाही.’’

कोरोनामुळे आम्हाला सध्या घरातूनच काम करावे लागत आहे. पुढील दोन-तीन महिने अशी परिस्थिती असू शकते. आता वर्क फ्रॉम होमला आम्ही सरावलो असून कामही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. 
- केदार देव, सॉफ्टवेअर डेव्हलपर

वर्क फ्रॉम होममध्ये
    कंपन्यांकडून इंटरनेट पुरविले जाते 
    कामाची पद्धत, वेळ, प्रोजेक्‍ट यावर देखरेख 
    साप्ताहिक सुटी व रजाही देण्यात येते 
    किमान ८ ते १० तास काम 
    ग्रुप, कॉन्फरन्स, व्हिडिओ कॉलचे प्रमाण वाढले

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तंत्रज्ञानाची चाचपणी
सध्या आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे ऑनसाइट जाणे बंद झाले आहे. त्यामुळे संबंधित साइटवर काम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांची मदतही घेतली जात असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात आले.

येथे आहेत प्रमुख आयटी कंपन्या 
हिंजवडी, मगरपट्टा, खराडी, नगर रस्ता, बाणेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिक्षक मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्याला हटवलं, मतमोजणीच्या आधी भाजपच्या बंडखोर नेत्याने केलेली IAS विरोधात तक्रार

Sugarcane Price Protest : 'स्वाभिमानी'ने दिल्लीला जाणारा 30 टन साखरेचा ट्रक 5 मैल परिसरात पाठलाग करून अडवला; कर्नाटकातून मिरज रेल्वेस्थानकाकडे निघाला होता ट्रक

Latest Marathi News Live Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आजपासून पूर्णेकर कुटुंबाचे आंदोलन

Ujani Dam: उजनीत १०३ टीएमसी पाणीसाठा; कर्नाटकची सात टीएमसीची मागणी, ३० ऑक्टोबरला निर्णयाची शक्यता

मानधन वाढवून मागितलं अन् नाटकातून काढलं! ‘आमने सामने’मधून रोहन गुजर, केतकी पालव रिप्लेस; म्हणाले…'शेवटचं गुडबायही करता आलं नाही ’

SCROLL FOR NEXT